Site icon HW News Marathi

राज्यसभा निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीला मोठा धक्का; मलिक-देशमुखांचा मतदानाचा अर्ज फेटाळला

मुंबई | राज्यसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक आणि राज्याचे माजी अनिल देशमुख यांचा मतदान करण्याचा अर्ज पीएमएलए विशेष न्यायालयाने फेटाळला.  मलिक आणि देशमुखांना राज्यसभा निवडणुकीत मतदान करता यावे, म्हणून न्यायालयात अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने मलिक आणि देशमुखांच्या अर्जावर आज (9 जून) न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी राज्यसभेत मलिक आणि देशमुखांना मतदान करता येणार नाही. यामुळे राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला दोन मते कमी पडणार आहेत.

महाराष्ट्रात राज्यसभेच्या सहा जागेसाठी उद्या (10 जून) मतदान होणार आहे. परंतु, राज्यसभेसाठी महाराष्ट्रात 7 उमेदवार देण्यात आले आहे. यामुळे राज्यात राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी कलगीतुरा रंगला आहे. या पार्श्वभूमीवर मलिक आणि देशमुखांनी न्यायालयात अर्ज दाखल केले होती. मलिक आणि देशमुख यांच्या अर्जावर विशेष न्यायालयाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांनी काल (8 जून) सुनावणी झाली होती. यावेळी न्यायालयाने दोन्ही बाजुचा युक्तीवाद ऐकून आज निकाल राखून ठेवला होता. न्यायालयाने आज मलिक आणि देशमुख यांचा राज्यसभा निवडणुकीत मतदान करण्याचा अर्ज फेटाळून लावला होता.

नवाब मलिक यांना अंमलबजावणी संचालनालयाने अर्थात ईडीने 23 फेब्रुवारी महिन्यात अटक केली होती. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आतापर्यंत ईडीने मलिक यांच्या अनेक मालमत्ता जप्त केल्या आहेत.  तर देशमुखांनी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना १०० कोटीची वसुली केल्याचा आरोप परमबीर सिंह यांनी केला होता. या संपूर्ण प्रकरणाचा तपास ईडी करत असून या प्रकरणी ईडीने देशमुखांच्या घर आणि कार्यालयावर छापे टाकले होते. देशमुखांनी ईडीची अटक केली.

संबंधित बातम्या
राज्यसभेसाठी मतदानासाठी मलिक-देशमुखांचे ED न्यायालयात अर्ज; 8 जूनला होणार सुनावणी
Exit mobile version