HW Marathi
राजकारण विधानसभा २०१९

मला नाव कमाविण्यापेक्षा सर्वसामान्यांचे आशीर्वाद कमवायचे आहेत !

मुंबई | विधानसभा निवडणूक आता अवघ्या काहीच दिवसांवर येऊन ठेपलेली असताना राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी आपली कंबर कसली आहे. याच पार्श्वभूमीवर महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी परळी येथील जनतेशी संवाद साधला. यावेळी पंकजा मुंडे यांनी परळीतील जनतेला भावनिक साद घातली. “माझ्या आयुष्यातल्या प्रत्येक क्षणी समाजातील गरीब, वंचित आणि पिडित घटकांसाठी काम करण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे. नाव कमाविण्यापेक्षा मला सर्वसामान्य जनतेचे आशीर्वाद कमवायचे आहेत”, असे विधान पंकजा मुंडे यांनी केले आहे.

“माझ्यावर मुंडे साहेबांचे संस्कार आहेत. त्यामुळे माझ्यावर जरी कोणीही कितीही आरोप केले तरीही मी जनतेची सेवा करतच राहणार”, असेही पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या. त्याचप्रमाणे यावेळी जनतेला आश्वासन देताना पंकजा मुंडे यांनी पुन्हा एकदा विरोधकांना धारेवर धरले आहे. “हे लुच्चे लफंगे लोक खोटं बोलतात. गावातील महिलांच आता त्यांना धडा शिकवतील”, असे पंकजा मुंडे म्हणाल्या. परळी मतदारसंघातील बचतगटांच्या ८०० महिलांना सरकारतर्फे गायवाटप करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या.

राज्यातील विधानसभा निवडणूक आता अवघ्या काहीच दिवसांवर येऊन ठेपली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी भाजप-शिवसेनेत प्रवेश केल्याने एकीकडे भाजप-शिवसेनेची ताकद वाढली आहे. तर दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादीला मात्र आता राज्यात आपले अस्तित्व टिकवून ठेवण्याचे मोठे आव्हान आहे. दरम्यान, आता सर्वच राजकीय पक्षांकडून विधानसभेच्या तयारीला सुरुवात झाली आहे.

Related posts

राहुल गांधी पाकिस्तानच्या हातचे बाहुले बनले, जावडेकरांची टीका

News Desk

गोव्याच्या मंत्रीमंडळाची आज पुनर्रचना, ४ नव्या मंत्र्यांना मिळणार ‘ही’ जबाबदारी

News Desk

…म्हणूनच सीबीआयच्या संचालकांना हटविले, राहुल गांधींची मोदींवर टीका