HW Marathi
महाराष्ट्र राजकारण विधानसभा २०१९

शिवस्वराज्य यात्रा संपली कि राष्ट्रवादी देखील संपेल !

पुणे | “शिवस्वराज्य यात्रेच्यानिमित्ताने सध्या डॉ.अमोल कोल्हे राष्ट्रवादीकरिता किती तरी मतदारसंघ फिरत आहेत. लोकांमध्ये माझ्याबद्दल खोटी माहिती पसरविली जात आहे. मात्र, ही शिवस्वराज्य यात्रा संपली कि राष्ट्रवादी देखील संपेल”, अशी बोचरी टीका शिवसेना नेते आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांच्यावर केली आहे. “अमोल कोल्हे नेमके आहेत कुठे ? किती वेळा ते भोसरीत आले ? अमोल कोल्हेंना निवडून दिल्याचा आता लोकांना पश्चाताप होत आहे”, अशीही टीका यावेळी त्यांनी केली.

“ते मतदारसंघात दिसतात तरी कुठे ? ते आहेत कुठे ? ते जिथे जिथे जातात तिथले लोक पक्षातून बाहेर पडताना दिसत आहेत. त्यांना निवडून दिल्याचा आता लोकांना पश्चाताप होत आहे. आता राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा संपली की राष्ट्रवादी देखील संपेल, असे शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले. अमोल कोल्हे यांनी केवळ शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या नावावर भावनेचे आणि जातीचे राजकारण केल्याचा आरोप देखील शिवाजीराव आढळराव पाटील यांनी अमोल कोल्हे यांच्यावर केला आहे.

माझा पराभव केवळ छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेमुळे !

यंदाच्या लोकसभेत शिरूर मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी सलग १५ वर्षे शिरूरचे खासदार राहिलेल्या शिवसेना उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव केला होता. दरम्यान, शिवसेनेसाठी हा मोठा धक्का होता. त्यानंतर, “माझा लोकसभेत झालेला पराभव हा राष्ट्रवादी किंवा अमोल कोल्हे यांच्यामुळे नाही तर छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेमुळे आहे”, असे म्हणत शिवाजीराव आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादीसह अमोल कोल्हेंवर निशाणा साधला होता.

Related posts

मुख्यमंत्री महोदय टोल चालकांनाही देशभक्ती शिकवा! : सचिन सावंत

News Desk

#Elections2019 : जाणून घ्या…अमरावती मतदारसंघाबाबत

News Desk

मराठा आरक्षणचा एटीआर आज विधिमंडळात !

News Desk