HW Marathi
७३ वा स्वातंत्र्य दिन देश / विदेश

#IndependenceDay | गुगलकडून भारताला स्वातंत्र्यदिनाच्या खास शुभेच्छा !

नवी दिल्ली | देशभरात आज भारताचा 73 वा स्वातंत्र्यदिन मोठ्या दिमाखात साजरा होत आहे. दरम्यान, दरम्यान, गुगलकडून अशा विशेष दिनी डूडलमार्फत देण्यात येणाऱ्या शुभेच्छा या तितक्यात विशेष आणि आकर्षक असतात. आज देखील गूगलने भारताला ७३ स्वातंत्र्यदिनानिमित्त डूडलमार्फत शुभेच्छा दिल्या आहेत. भारतीय कलाकार शैवलिनी कुमार यांनी हे डूडल तयार केले आहे. या डूडलमध्ये भारताची ओळख मानल्या जाणाऱ्या, भारताच्या संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या विविध चित्रांचे पॅचवर्क आहे. भारताची महत्त्वाकांक्षी योजना चांद्रयान-२, तिरंगी पतंग, शिक्षण, कला, मोरपंख, लोकसभा, मेट्रो, रिक्षा, कलम ३७७ रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय, देशातील वाघांची संख्या वाढल्याने भारताचा राष्ट्रीय प्राणी वाघ अशा अनेक चित्रांचे अत्यंत बोलके असे हे पॅचवर्क आहे.

सविस्तर वृत्त लवकरच…

Related posts

निवडणुकीत गुन्हेगार नेत्यांवर बंदी ?

अपर्णा गोतपागर

काश्मिरात ‘लष्कर’च्या दोन अतिरेक्यांना कंठस्नान

News Desk

कामाख्या एक्स्प्रेसला शार्ट सर्किटमुळे आग, सुदैवाने मोठा अनर्थ टळला

News Desk