HW News Marathi
Covid-19

मुंबईत लॉकडाऊन की मिनी लॉकडाऊन? आज संध्याकाळी होणार निर्णय! – किशोरी पेडणेकर

मुंबई | दैनंदिन कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे मुंबईची चिंता वाढली आहे. अशातच मुंबईतील रुग्णांची संख्या जर २० हजारांच्या वर गेली तर मुंबईत लॉकडाऊन करण्याचा विचार केला जाऊ शकतो, असे संकेत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी याआधी दिले होते. त्यानंतर काल (६ जानेवारी) मुंबईत २० हजाराहून अधिक रुग्णांची नोंद झाली आणि आज किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी वाढत्या रुग्णसंख्येवर चिंता व्यक्त केली आहे. तसेच लॉकडाऊन लावण्याबाबत आज (७ जानेवारी) संध्याकाळी निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले आहे.

प्रसार माध्यमांशी संवाद साधताना पेडणेकर म्हणाल्या, “सध्या तरी संपूर्ण लॉकडाऊन करण्याचा कोणताही विचार नाहीये. पण काही नागरिक बेफिकीर राहतात, नियमांचं गांभीर्याने पालन करत नाहीत. त्यामुळे रुग्ण संख्या वाढत राहिली तर कठोर पावलं उचलावी लागतील”, असे सांगताना मुंबईत मिनी लॉकडाऊन लावला जाऊ शकतो, असा इशाराही त्यांनी दिला आहे. आज संध्याकाळी ७ वाजेपर्यंत मिनी लॉकडाऊनबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय जाहीर करतील, अशी माहिती पेडणेकर यांनी दिली आहे. तसेच रुग्ण संख्या जरी वाढत असली, तरी या घडीला संपूर्ण लॉकडाऊन परवडणारं नाही, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.

वीकेंड लॉकडाऊन लागू करण्याचा विचार

लोकल ट्रेन आणि बसमध्ये लोकांची गर्दी थांबत नसल्याचे यावेळी पेडणेकर यांनी सांगितले. तसेच वीकेंडला लोकं चौपाटी व इतर सार्वजनिक ठिकाणी गर्दी करत आहेत. त्यामुळे गर्दी रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिका वीकेंडला लॉकडाऊन लागू करण्याचा विचार करत आहे, असंही त्यांनी सांगितलं. यासोबतच दुकानांच्या वेळेतही बदल करण्याचा विचार करण्यात आला आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मंजुरी मिळाल्यानंतर आज सायंकाळपर्यंत मुंबईत मिनी लॉकडाऊनचे नियम जारी केले जातील.

२२ हजार बेड्सची तयारी

कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता मुंबई महापालिकेचीही तयारी सुरू आहे, असे म्हणत त्यांनी कोरोना रुग्णांसाठी रुग्णालयांतील बेड्स वाढवणार असल्याची घोषणा केली आहे. यामध्ये गंभीर रुग्णांसाठी २२ हजार बेड्स राखीव ठेवले आहेत. तर सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी देखील काही बेड्स राखीव ठेवले असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच ७ हजार आयसीयू बेड्सची तयारी पालिकेने केली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

HW Exclusive | ‘हे’ असेल पर्यटन क्षेत्रापुढचे सर्वात मोठे आव्हान

News Desk

Weekend Lockdown मध्ये आमदार रवी राणांकडून नियमांचे उल्लंघन, उद्घाटन कार्यक्रमाला तोबा गर्दी

News Desk

देशात कोरोना रूग्ण संख्या परत घटली, बरे होणाऱ्यांची संख्या वाढली

News Desk