HW News Marathi
महाराष्ट्र

महापौरांविरोधात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी शेलारांना जामीन मंजूर

मुंबई | भाजप नेते आशिष शेलार यांना महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्या प्रकरणी जामीन मंजूर झाला आहे. शेलारांना १ लाख ऑन टेबल जामीन मंजूर झाला आहे. जामीन मंजूर झाल्यानंतर शेलारांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. शेलारांनी महापौरांच्या तक्रारीवरून दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करणारी याचिका न्यायालयात दाखल केला आहे. राजकीय आकसातून गुन्हा दाखल केल्याचा आरोप शेलारांनी शिवसेनेवर केला आहे.

यावरून आता भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्षांच्या महिलाआघाडी आमने-सामने आल्या आहेत. यानंतर महापौरांनी शेलारांविरोधात पोलिसांत तक्रार केली होती. यानंतर शेलार आज (९ डिसेंबर) मरिन ड्राईव पोलीस ठाण्यात जबाब नोंदविण्यासाठी गेले होते. यावेळी शेलार म्हणाले, “ओबीसी आरक्षणावर प्रश्न, वरळी बीडीडी चाळीत गॅस सिलिंडरचा स्फोटात मृत्यूचा जाब विचारला, कोष्टल रोड मधील भ्रष्टाचार, ममतादिदी यांच्यासोबत झालेल्या बैठक, आदी मुद्द्यावर ठाकरे सरकारवर प्रश्न विचरले.

जामीन मिळाल्यानंतर शेलाकर काय म्हणाले

“स्वतःच्या अंगावर ओडवून घेण्याचे काम शिवसेनेच्या सोशल मीडियाने केले. आणि जी केस होऊ बनू शकत नाही, ती केस बनविण्याचा प्रयत्न केला. आम्ही कायदा सुव्यवस्था मानणारे आहोत. न्यायव्यवस्था पाळणारे आहोत. जो काही खोटा गुन्हा त्यांनी दाखल केला. त्याबद्दल मी जामीन घेतला. त्याबरोबरीने मुंबई उच्च न्यायालयमध्ये ही FIR रद्द केली पाहिजे,” अशी याचिका शेलारांनी दाखल केल्याची माहिती प्रसार माध्यमांना दिली आहे.

नेमके काय आहे प्रकरण

मुंबईमधील वरळी बीडीडी चाळीत गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. वरळी स्फोटा घटनेत एक कुटुंबातील चार जण गंभीरित्या जखमी झाल्यानंतर त्यांना नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या स्फोटामध्ये चार महिन्याच्या बाळाचा मृत्यू झाला. ‘सिलिंडर स्फोटात ७२ तासानंतर मुंबईचे महापौर पोहोचतात, एवढे तास कुठे निजला होतात’ असे वक्तव्य केले.” शेलारांनी ४ डिसेंबरला पत्रकार परिषदेत आक्षेपार्ह टीप्पणी केली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विरोधकांना नमवण्यासाठीच ईडीचा वापर, काळ जाईल तेव्हा बघू, ईडीच्या कारवायांवरून शरद पवारांचा इशारा!

News Desk

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना २०२०चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर

News Desk

विधानभवनासमोर कांदा फेक आंदोलन

News Desk