चंदीगड। पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी नवीन पक्ष स्थापनेची घोषणा केली आहे. पंजाबच्या माजी मुख्यमंत्र्यांचे मीडिया सल्लागार रवीन ठुकराल यांनी मंगळवारी अनुक्रमे ट्विट करून ही माहिती दिली. त्यांनी माजी मुख्यमंत्र्यांच्या हवाल्यानं लिहिलं की, पंजाब आणि त्या लोकांसाठी ज्यात शेतकऱ्यांचाही समावेश आहे त्यांच्या चांगल्यासाठी लवकरच माझा नवीन राजकीय पक्ष स्थापन करेन.
मोठा राजकीय भूकंप झाला होता
कॅप्टन अमरिंदर सिंग पंजाबच्या मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार झाल्यानंतर मोठा राजकीय भूकंप झाला होता. त्यांच्या जागी नव्या मुख्यमंत्र्यांची नियुक्तीही करण्यात आली. त्यानंतर कॅप्टन भाजपत प्रवेश करणार अशा चर्चा रंगू लागल्या होत्या.शेतकरी आंदोलनात शेतकऱ्यांचे हित बघून तोडगा काढला गेल्यास २०२२ च्या पंजाब विधानसभा निवडणुकीत भाजपसोबत आपला पक्ष जागा वाटप करू शकेल. तसंच समविचारी पक्ष जे अकाली दलापासून वेगळे झाले आहेत, त्यांच्याशीही युती अपेक्षित आहे, असं कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी आणखी एका ट्विटमध्ये म्हटलं आहे.मी माझ्या लोकांचे आणि माझ्या राज्याचे भविष्य सुरक्षित करेपर्यंत मी शांत बसणार नाही. पंजाबला राजकीय स्थिरता आणि अंतर्गत आणि बाह्य धोक्यांपासून संरक्षण आवश्यक आहे, असं ट्विटही पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांचे मीडिया सल्लागार रवीन ठुकराल यांनी ट्विट केलं आहे.
‘Hopeful of a seat arrangement with @BJP4India in 2022 Punjab Assembly polls if #FarmersProtest is resolved in farmers’ interest. Also looking at alliance with like-minded parties such as breakaway Akali groups, particularly Dhindsa &
Brahmpura factions’: @capt_amarinder 2/3 https://t.co/rkYhk4aE9Y— Raveen Thukral (@Raveen64) October 19, 2021
राज्याचे भविष्य सुरक्षित करेपर्यंत मी शांत बसणार नाही
काही दिवसांपूर्वी पंजाबमध्ये मोठ्या मी माझ्या लोकांचे आणि माझ्या राज्याचे भविष्य सुरक्षित करेपर्यंत मी शांत बसणार नाही. पंजाबला राजकीय स्थिरता आणि अंतर्गत आणि बाह्य धोक्यांपासून संरक्षण आवश्यक आहे, असं ट्विटही पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांचे मीडिया सल्लागार रवीन ठुकराल यांनी ट्विट केलं आहे.काही दिवसांपूर्वी पंजाबमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. काँग्रेस नेतृत्वाने कॅप्टन अमरिंदर सिंग यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीमाना देण्याचे आदेश दिले. त्यानंतर चरणजीत सिंग चन्नी यांच्याकडे पंजाबचा कारभार सोपवला. घडामोडी घडल्या. काँग्रेस नेतृत्वाने कॅप्टन अमरिंदर सिंग यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीमाना देण्याचे आदेश दिले. त्यानंतर चरणजीत सिंग चन्नी यांच्याकडे पंजाबचा कारभार सोपवला.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.