HW News Marathi
महाराष्ट्र

राहुल गांधी, प्रशांत किशोरांचा रवांडाच्या सरकारने फोन टॅप केल्याचा नितीन राऊतांचा आरोप!

मुंबई। राज्याचे ऊर्जामंत्री आणि काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी पेगेसस मालवेअरच्या माध्यमातून हेरगिरीप्रकरणी आता ट्विट केलंय. यात त्यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी आणि निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांचा फोन टॅप अझरबैजान आणि रवांडाच्या सरकारांचा हात असल्याचा आरोप केलाय. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं, “माझी हळूहळू खात्री पटत चालली आहे की अझरबैजान आणि रवांडाच्या सरकारांनी राहुल गांधी आणि प्रशांत किशोर यांचे फोन टॅप केले होते.”

नितीन राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये कर्नाटकात कुमारस्वामी सरकार पाडण्यात मोरोक्कोचा हात होता, असंही म्हटलंय. तसेच शेवटी पेगासस हा हॅशटॅगही वापरला आहे.

फोन टॅपिंगचा गैरवापर केल्याचा आरोप

फोन टॅपिंग करून कर्नाटक आणि मध्य प्रदेशचे सरकार पाडले, काँग्रेसचा मोठा आरोप

दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील फोन टॅपिंग करूनच कर्नाटक आणि मध्य प्रदेशातील सरकार पाडण्यात आलं. सरकार पाडण्यासाठी केंद्र सरकारने फोन टॅपिंगचा गैरवापर केल्याचा आरोप केला आहे. नाना पटोले यांनी मीडियाशी बोलताना हा बॉम्ब टाकला. फोन टॅपिंगचा दुरुपयोग करून कर्नाटक आणि मध्य प्रदेशातील सरकार पाडल्याची माहिती समोर आली आहे. केंद्र सरकारने याचा गैरवापर केला. अनेकांचे फोन टॅप केले. ही गंभीर बाब आहे. संवैधानिक व्यवस्थेविरोधातील हे कृत्य आहे. त्यामुळे संबंधितांनी राजीनामा द्यायला हवा. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली पाहिजे, अशी मागणी पटोले यांनी केली.

उद्या राजभवनाबाहेर निदर्शने

पॅगेसास प्रकरण गंभीर आहे. या प्रकरणी उद्या गुरुवारी आम्ही राजभवनाबाहेर धरणे धरणार आहोत. याप्रकरणी राज्यपालांना निवेदन देणार आहोत. या प्रकरणात राष्ट्रपतींनीच हस्तक्षेप करावा, अशी मागणी आम्ही राज्यपालांकडे करणार आहोत, असंही त्यांनी सांगितलं.

चौकशी समिती स्थापन करा

विधानसभेत मी फोन टॅपिंगचा मुद्दा उपस्थित केला होता. माझेही फोन टॅप करण्यात आले होते. त्यावर सरकारने चौकशी समिती स्थापन करण्याचे आश्वासन दिले होते. सरकारने ही समिती लवकर स्थापन करावी आणि या प्रकरणाची माहिती समोर आणावी, अशी मागणी त्यांनी केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नवीन अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे धडे समाविष्ट करण्याचा निर्णय घेणार! – चंद्रकांत पाटील

Aprna

भाजप नेते किरीट सोमय्या यांना पोलीसांनी घेतले ताब्यात

News Desk

कॅगच्या अहवालाचे केवळ ‘सीलेक्टिव्ह लीकेज’ का केले गेले, फडणवीसांचा सवाल

News Desk