HW News Marathi
महाराष्ट्र

प्रदीप शर्मांच्या घरावर NIA ने छापा टाकल्यानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई | प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी धमकी प्रकरण आणि व्यावसायिक मनसुख हिरेन हत्या प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांच्या घरावर छापा टाकला आहे. अंबानी धमकी आणि मनसुख हिरेन यांच्या हत्येशी प्रदीप शर्मा यांचा संबंध असावा, असा संशय एनआयएला आहे. याप्रकरणी त्यांची याआधीही चौकशी करण्यात आली असून आज सकाळी अंधेरीतील घरावर छापा टाकण्यात आला आहे. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते मुंबईत आज (१७ जून) प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

काय म्हणाले संजय राऊत?

“मला यायंबंधी काही माहिती नाही. कायदेशीर बाबीत आपण पडणं योग्य नाही. सरकार आमचं आहे, केंद्रीय तपास यंत्रणा वारंवार येतात आणि कारवाई करतात. यासंबंधी मुख्यमंत्री, राज्याचे गृहमंत्री, गृहसचिव, मुंबईचे पोलीस आयुक्त आणि जे कायदा सुव्यवस्था यातील प्रमुख आहेत तेच अधिकृतपणे बोलू शकतील. ज्या विषयाची माझ्याकडे माहिती नाही त्याबद्दल मी बोलणार नाही,” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

एनआयएकडून सकाळी सहा वाजल्यापासून कारवाई सुरु असून प्रदीप शर्मांच्या अंधेरीमधील घराबाहेर मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. यादरम्यान प्रदीप शर्मा यांना अटक केली जाण्याची शक्यता आहे. उद्योगपती मुकेश अंबानी धमकी प्रकरणात एनआयएने याआधी माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांची चौकशी केली होती. अंबानी यांना धमकी आणि व्यावसायिक मनसुख हिरेन यांच्या हत्येशी शर्मा यांचा संबंध असावा, असा संशय एनआयएला आहे.

शर्मा यांना बहुचर्चित रामनारायण गुप्ता ऊर्फ लखनभैया हत्येप्रकरणी (बनावट चकमक) अटक झाली होती. सुमारे तीन वर्षे ते कारागृहात होते. मनसुख हत्येप्रकरणी एनआयएने अटक केलेला निलंबित पोलीस शिपाई विनायक शिंदे लखनभैया हत्या प्रकरणात सहआरोपी होता. या गुन्ह्यातून शर्मा वगळता उर्वरित सर्व आरोपींना(शिंदेसह) न्यायालयाने दोषी ठरवत शिक्षा ठोठावली. निर्दोष मुक्त झाल्यानंतर शर्मा यांनाही पुन्हा सेवेत घेण्यात आले.

सध्या चर्चेत असलेले परमबीर सिंह ठाणे शहरात पोलीस आयुक्त असताना शर्मा यांच्याकडे तेथील खंडणीविरोधी पथकाच्या प्रमुखपदाची जबाबदारी होती. शर्मा यांच्याकडे ७ एप्रिलला सुमारे आठ तास चौकशी केल्यानंतर ८ एप्रिलला त्यांना एनआयएने पुन्हा चौकशीस बोलावलं होतं. या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि जुने सहकारी सचिन वाझे यांना समोर आणून शर्मा यांच्याकडे एनआयएने चौकशी केल्याची माहिती मिळाली होती.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एकनाथ खडसेंचा मुक्ताईनगरमध्ये धमाका, महाविकासआघाडी पुरस्कृत पॅनलचा विजय

News Desk

केंद्रीय मंत्र्यांची आजपासून जनआशीर्वाद यात्रा!

News Desk

राज्यासह मुंबईतही पावसाचा जोर कायम, सखल भागात साचले पाणी

News Desk