HW News Marathi
Covid-19

फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना फोन ! रश्मी ठाकरेंच्या तब्येतीची केली विचारपूस…

मुंबई | महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढतोय.अगदी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबातही कोरोनाचा प्रसार झाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि मुलगा आदित्य ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली.रश्मी ठाकरे सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन केल्याची माहिती मिळत आहे.यावेळी त्यांनी रश्मी ठाकरेंच्या तब्येतीबद्दल चौकशी केली आहे. तसेच राज्यातील वाढत्या कोरोनाच्या परिस्थितीबाबतही दोनांमध्ये चर्चा झाल्याच माहिती कळत आहे.

फडणवीसांकडुन रश्मी ठाकरेंच्या तब्येतीबद्दल चौकशी

राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि मुलगा आदित्य ठाकरे हे दोघेही कोरोनाबाधित आहेत. सद्यस्थितीत रश्मी ठाकरे यांच्यावर एच एन रुग्णालयात उपचार सुरु आहेत. नुकतंच देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन केला होता. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंना रश्मी वहिनींची तब्येत कशी आहे? अशी विचारपूस केली.

राज्यातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चर्चा

तसेच राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या परिस्थितीवर मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सरकार जो निर्णय घेईल, त्याबाबत विरोधी पक्षांकडून सहकार्य मागितले. त्यावेळी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे, असे बोललं जात आहे.

उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंवर फोन ,सहकार्याची विनंती

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंना फोन करत राज्य सरकारने जर लॅाकडाऊनचा निर्णय घेतला तर त्यांना मनसेने सहकार्य कराव असं म्हटलं आहे.यासंबंधी उद्धव ठाकरे राज ठाकरे यांना म्हणाले की , राज्यातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत लॉकडाऊनचा मार्ग स्वीकारावा लागू शकतो,त्यामुळे अशा परिस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सहकार्य करावं,असं आवाहन मुख्यमंत्री मा.श्री. उद्धव ठाकरे ह्यांनी राजसाहेबांना फोनवरील संवादात केलं.

त्यामुळे आज जी कॅबिनेटची बैठक होत आहे त्यानतंर महाराष्ट्रात लाॅकाडऊन घोषित केले जाण्याची दाट शक्यता आहे.हा लॅाकडाऊन मर्यादित कालावधीसाठी केला जाऊ शकतो अशी माहिती मिळत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मी बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो कि … ! वाझेंच्या आरोपांवर अनिल परबांचे स्पष्टीकरण

News Desk

कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केरळमध्ये पुन्हा संपूर्ण लॉकडाऊन

News Desk

“शेण, गोमूत्र व यज्ञावरच भागवावे लागेल काय?”, राऊतांचा मोदींना सवाल

News Desk