HW News Marathi
देश / विदेश

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राजीनामा द्यावा, काँग्रेसची मागणी!

उत्तरप्रदेश | उत्तरप्रदेशातील हाथरस येथे १९ वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्काराची मन हेलावणारी घटना घडली. पीडित तरुणीचा काल (२९ सप्टेंबर) दुर्दैवी मृत्यू झाला. दिल्लीच्या सफदरजंग येथील रुग्णालयात पीडित तरुणीवर उपचार सुरु होते. ही तरुणी १४ सप्टेंबरपासून मृत्यूशी झुंज देत होती. ४ जणांनी या तरुणीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. या तरुणीच्या मृत्यूनंतर उत्तर प्रदेशमधील वातावरण चांगलेच तापले असून आरोपींना कठोर शिक्षा केली जावी अशी मागणी संपूर्ण देशभरातून केली जात आहे. या प्रकरणामध्ये पोलिसांच्या भूमिकेबद्दलही संक्षय व्यक्त केला जात आहे. यावरुनच आता काँग्रेसने उत्तर प्रदेश पोलीस आणि उत्तरप्रदेशमध्ये सत्तेत असणाऱ्या भाजप सरकारवर टीका केली आहे. भाजपाचे हे सरकार असे क्रूर का आहे?, असा प्रश्न काँग्रसने ट्विटरवरुन उपस्थित केला आहे.

“उत्तर प्रदेशमधील १९ वर्षीय दलित मुलीवर सामूहिक बलात्कार करुन तिची क्रूर हत्या करण्यात आली असून यावरुन पोलीस व्यवस्थेचा खोटारडेपणा उघड होत आहे. उत्तर प्रदेशमध्ये महिला, मुली असुरक्षित आहेत. उत्तर प्रदेश सरकार कारवाईच्या नावाखाली केवळ स्वत:चा बचाव करत आरोपींना संरक्षण देते,” असं काँग्रेसने म्हटलं आहे. काँग्रेसने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राजीनामा द्यावी अशी मागणी केली आहे. १० दिवस कोणालाही अटक करण्यात आली नाही, पीडितेच्या कुटुंबाला अंत्यसंस्कारामध्ये सहभागी होऊ दिले नाही, उत्तर प्रदेश पोलिसांनी कुटुंबाच्या परवानगीशिवाय पार्थिव ताब्यात घेत अंत्यसंस्कार केले असे तीन मुद्दे मांडत भाजपाचे हे सरकार असे क्रूर का आहे?, असा प्रश्न काँग्रेसने उपस्थित केला.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘त्या’ २२० जागांमध्ये संगमनेरदेखील असेल !

News Desk

मरीना बीचवरील अंत्यसंस्काराचा नेमका वाद काय ?

swarit

सुशांतचे वडील म्हणतात, सुशांतने आत्महत्या केलीही असेल !

News Desk