HW News Marathi
मुंबई

मुंबईतील कोरोनाच्या वाढत्या संसर्गाने नो गो झोनमध्येही वाढ

मुंबई | राज्यातील कोरोनाबाधितांचा लाढता आकडा लक्षात घेत पोलिस प्रशासन, आरोग्य विभाग सगळेच प्रयत्नशील आहेत. सोमवारी (३० मार्च) वरळी कोळीवाड्यात कोरोनाचे रुग्ण सापडल्यानंतर संपूर्ण वरळी कोळीवाडा पोलिसांकडून सील करण्यात आला. दरम्यान, मुंबईतील जे विभाग सील करण्यात आले आहेत त्यांना नो गो झोन असे नाव देण्यात आले आहे.

या आठवड्यात पालिकेने एकूण १९१ परिसर सील केले आहेत. काल (१ एप्रिल) ४५ नवे परिसर सील करण्यात आले. पोलिसांनी परिसरात बॅरिकेट्स लावले असून येथील नागरिकांना बाहेर पडण्यास आणि बाहेरच्या व्यक्तीला आत जाण्यास मनाई करण्यात आली आहे. दक्षिण मुंबईतील ४८ परिसर सील करण्यात आले आहेत, यात मलबार हिल, वाळकेश्वर, पेडर रोड, बेलासीस रोड, वरळी कोळीवाडा आणि प्रभादेवीचा समावेश आहे.

तर, पश्चिम उपनगरीय भागात ४६ परिसर हे सील करण्यात आले आहेत. त्यात वांद्रे पश्चिम आणि खार परिसराचा समावेश आहे. हिल रोड, एसव्ही रोड, २१ रोड, गर्व्हमेंट कॉलनी, बिंबिसार नगर हे परिसरही सील करण्यात आले आहेत. तर पूर्व उपनगरीय भागातील ४८ परिसर हे सील करण्यात आले आहेत, यात चेंबूर आणि घाटकोपरमधल्या भागांचा अधिक समावेश आहे. पोलिस प्रशासन या नो गो झोनद्वारे कोरोनाला ऱोखण्यासाठी आणखी एक महत्त्वाचा उपक्रम राबवत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रिलायन्स कंपनीची निवड कुणी केली, हे ड सॉल्ट एव्हीएशनलाच माहिती !

Gauri Tilekar

पत्नीच्या विरहाने पतीचेही निधन

News Desk

पुणे – सोलापूर महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू तर सहा जण जखमी

News Desk