HW News Marathi
Covid-19

अखेर ! चीनच्या हुबेई प्रांताने लाॅकडाऊननंतर आज घेतला मोकळा श्वास !

चीन | कोरोनाला रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवस लाॅकडाऊन जाहीर केले आहे,तोपर्यंत घराच्या बाहेर येऊ नका अशा सुचना दिल्या गेल्या आहेत. आता भारतात एकीकडे लाॅकडाऊन जाहीर झाले असताना ‘कोरोना विषाणू’च्या प्रसाराला जिथून सुरुवात झाली, त्या चीनमधील हुबेई प्रांतातील लाॅकडाऊनआज (२५ मार्च) ला हटवण्यात आले आहे. तब्बल ६० दिवसांनंतर या प्रांताचे ‘कुलूप’ काढण्यात आले आहे.

चीनच्या वुहानमध्ये गतवर्षी ३१ डिसेंबरला पहिला कोरोनाचा रूग्ण आढळून आला होता. त्यानंतर चीनमध्ये कोरोनामुळे हाहाःकार माजला होता. वुहानमध्ये अदयापही लाॅकडाऊन आहे. मात्र गेल्या पाच दिवसात हुबेईमध्ये एकही नवा रुग्ण आढळला नाही. सहा कोटी लोकसंख्या असलेल्या हुबेई प्रांतात सर्व मेट्रो स्टेशन, बस, रेल्वे स्थानक निर्जंतुक केली गेली. डिसेंबरनंतर पहिल्यांदा म्हणजे 90 दिवसांनी हुबेईकर नागरिक मोकळा श्वास घेतील. परंतु हुबेईची राजधानी वुहानमध्ये 23 जानेवारीला लागलेले टाळे 8 एप्रिलला उघडणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Corona World Update : जगभरात ४० लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची बाधा

News Desk

Unlock 1.0 | देशात गेल्या २४ तासात ९९८३ नवे कोरोना रुग्ण आढळले

News Desk

‘रेड झोन’मधील विमानतळ अशा परिस्थितीमध्ये सुरू करणे अत्यंत धोकादायक !

News Desk