नवी दिल्ली | मध्य प्रदेशच्या विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यास असमर्थ ठरल्याने कमलनाथ यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता मध्य प्रदेशमध्ये भाजपने सत्तास्थापनेचा दावा केला आहे. भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी चौथ्यांदा मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. थोड्याच वेळापूर्वी राजभवनात शिवराजसिंह चौहान यांनी मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. भाजपच्या बैठकीत शिवराजसिंह चौहान यांची गटनेता म्हणून निवड करण्यात आली होती. भाजपच्या सर्व आमदारांनी यावेळी शिवराजसिंह चौहान यांच्या नावाला मोठ्या प्रमाणात समर्थन दिले होते.
Bhopal: BJP's Shivraj Singh Chouhan takes oath as the Chief Minister of #MadhyaPradesh, at Raj Bhavan. pic.twitter.com/nJuy5TCQR2
— ANI (@ANI) March 23, 2020
मध्य प्रदेशमधील ज्योतिरादित्य सिंधीयांसारख्या बड्या नेत्याने काँग्रेसमधून बाहेर पडत भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर कमलनाथ सरकारमधील काँग्रेसच्या २२ आमदारांनी देखील बंडखोरी करत आपल्या पदाचा राजीनामा दिला. काँग्रेसच्या आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे कमलनाथ सरकार चांगलेच अडचणीत सापडले. अल्पमतात असलेले कमलनाथ सरकार विधानसभेत बहुमत चाचणी सिद्ध करण्यास अपयशी ठरणार हे स्पष्ट असल्याने कमलनाथ यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपाल लालजी टंडन यांच्याकडे सुपूर्द केला. त्यानंतर भाजपने मध्य प्रदेशमध्ये सत्तास्थापनेचा दावा केला. मध्य प्रदेशमध्ये ऑपेरेशन लोटस यशस्वी झाले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.