HW News Marathi
देश / विदेश

काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट ६ महिन्यांसाठी वाढवावी | शहा

नवी दिल्ली | “जम्मू- काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट ६ महिन्यांनी वाढविण्याचा प्रस्ताव गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत मांडला आहे.” या वर्षाच्या शेवटी काश्मीरमध्ये निवडणुकी होण्याची शक्यता शहा यांनी सभागृहात वर्तवली आहे.शहा यांनी आज(२८ जून) जम्मू-काश्मीर आरक्षण संशोधन विधेयक लोकसभेत मांडताना म्हणाले की, काश्मीरमध्ये दहशतवाद खपवून घेणार नसल्याचे शहांनी ठणकावून सांगितले आहे.

कलम ३५६ चा उपयोग करत २० डिसेंबरपासून राष्ट्रपती राजवट लागू केली. २ जुलै रोजी या राजवटीचा सहा महिन्याचा कालावधी संपत आहे. यामुळे राष्ट्रपती राजवटीचा कालावधी वाढवावा, असे सांगत अमित शहा यांनी लोकसभेत प्रस्ताव मांडला. जम्मू काश्मीरच्या घटनेतील कलम ५ आणि ९ अंतर्गत आरक्षणाच्या तरतुदीत दुरुस्ती करुन आणखी क्षेत्र जोडावी. जम्मू काश्मीरमधील भारत-पाक सीमेवर राहणाऱ्या नागरिकांना ३ टक्के आरक्षण द्यावे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Union Budget 2021 |  मिशन पोषण 2.0 ची अर्थमंत्र्यांकडून घोषणा

News Desk

जैशची मोदींना धमकी

News Desk

ऑलिम्पिक स्पर्धेतील खेळाडूंना क्षमता सिद्ध करण्यासाठी मिळाला दिलासा

News Desk