HW News Marathi
महाराष्ट्र

अशा संख्यावाचनाने गणित सोप्पं होणार कि अवघड ?

मुंबई । एकवीस म्हणायचं की वीस एक…असा गोंधळ सध्या शिक्षण विभागात पाहायला मिळतोय. त्याच कारणही शिक्षण विभागानं केलेला बदल हाच आहे. मुलांच्या मनातील गणिताची भीती दूर व्हावी, यासाठी इयत्ता दुसरीच्या गणिताच्या पुस्तकात संख्यावाचनात काही बदल करण्यात आलेय. आणि या बदलावरुनच आता नविन वाद सुरु झालाय. या बदलामुळे मराठी भाषेची मोडतोड करण्यत येत असल्याची टीका काही भाषा अभ्यासक आणि तज्ञांनी केली आहे. आता बालभारतीच्या दुसरीच्या पुस्तकातील संख्यावाचन हे 21 ते 99 हे आकडे यापुढे जोडाक्षराप्रमाणे नाही, तर संख्यावाचनाप्रमाणे शिक्षकांनी शिकवायचे आहेत. म्हणजेच 32 या आकड्याचा थेट बत्तीस असा उल्लेख न करता ‘तीस दोन’ असा उल्लेख करावा लागेल. जोडाक्षरामुळे विद्यार्थ्यांचा संभ्रम होतो आणि त्यामूळे गणिताची आवड निर्माण होत नाही असं बालभारतीचं म्हणणं आहे. सोबतच इंग्रजीबरोबर कानडी, तेलगू, तामिळ या भाषांमध्येही अशाच प्रमाणे शिक्षण होत असल्याचं बालभारतीनं सांगितलंय.

शिक्षण पद्धतीला एका वेगळया वळणावर नेण्याचे काम

या बदलानंतर मात्र मोठा वाद सुरु झालाय. विरोधी पक्षानंही यावरुन सरकारला घेरण्याचा प्रयत्न केलाय. जे महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या अंगवळणी पडले आहे. ते बदलून वेगळे वळण देण्याचे काम बालभारतीच्या माध्यमातून करण्याचे षडयंत्र महाराष्ट्रात या सरकारने रचले आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केला. बालभारतीचा जो विषय आहे तो शिक्षण पद्धतीला एका वेगळया वळणावर नेण्याचे काम जाणीवपुर्वक सरकार करायला लागले आहे. या वेगळ्या पद्धतीने या शिक्षण पद्धतीला वेगळं वळण देण्याचे कारस्थान भाजप करत आहे असा आरोपही जयंत पाटील यांनी केला.

मराठीच इंग्रजीकरण करणाचा प्रकार

तर हा बदल म्हणजे मराठीला मारक ठरणारा, मराठीच इंग्रजीकरण करणाचा प्रकार असल्याचं मत लोकभारतीचे आमदार कपिल पाटील यांनी व्यक्त केलय. हे मराठी भाषेवर आलेले भयंकर संकट आहे. मराठी भाषेचा पाढा बदलून टाकायचा आणि मराठी संस्कृती मारून टाकायची, असा विचार असल्याचे दिसून येत आहे. ही कल्पना कुणाच्या डोक्यात आली, याचा शोध घ्यायचा आहे. अनेक भाषातज्ज्ञांशी याबाबत चर्चा केली; परंतु हे नवीन शास्त्र हे कोणत्याच मराठी संस्कृतीत बसत नाही. शिक्षणामध्ये जे विनोद झाले, त्याचे नवीन आव्हान आता नव्या शिक्षणमंत्र्यावर आहे असं मत कपिल पाटील यांनी व्यक्त केलय.

नको त्या प्रश्नांमध्ये शिक्षण विभाग डोक घालत आहे

शिक्षण क्षेत्रात अनेक प्रश्न असतांना ग्रामिण भागातील शिक्षणाची अतिशय बिकट अवस्था असतांना नको त्या प्रश्नांमध्ये शिक्षण विभाग डोक घालत आहे. ग्रामीण भागात डोकावून पाहील्यास जिल्हा परिषदेच्या अनेक शाळा अशा आहेत जिथे शाळेच छत कधी मुलांच्या अंगावर पडेल याचा नेम नाही अशी अवस्था आहे. त्याचबरोबर जे शिक्षण एका आमदार खासदाराच्या मुलांना मिळते तेच एका गरीब घरच्या मुलाला मिळते का हे शिक्षण विभागानं पहावं असा सल्लाही कडू यांनी दिलाय. माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी जी घाण करुण ठेवली आहे ती नवे शिक्षणमंत्री शेलार साफ करतील का ? असा आरोपवजा सवालही त्यांनी केलाय.

विद्यार्थ्यांमध्ये गणिताची आवड निर्माण करणे हाच उद्देश

तर विशेष म्हणजे हा बदल मागील वर्षी इयत्ता पहिलीपासूनच केला आहे, त्यामुळे टीका करणाऱ्यांनी किमान पहिली आणि दुसरीची पुस्तके चाळावीत, अशा शब्दांत ‘बालभारती’च्या गणित विषयतज्ज्ञ असलेल्या समितीच्या अध्यक्षा डॉ. मंगला नारळीकर यांनी सर्व वाद घालणाऱ्यांना उत्तर दिलय. इंग्रजी व चार दाक्षिणात्य भाषांमध्येही संख्या वाचन असेच केले जाते. पण हे त्यांचे अनुकरण नसून ते सोपे वाटले म्हणून घेतले आहे. त्यामागे विद्यार्थ्यांमध्ये गणिताची आवड निर्माण करणे, हा एकमेव उद्देश नारळीकर यांनी सांगितलय.

व्यवहारात गोंधळ निर्माण करण्याचे काम

तर या संदर्भात शिक्षण तज्ञ श्याम सोनार यांच्याशी बातचित केली असता या बदलाचा व्यवहारात उपयोग करतांना मोठ्या अडचणी येउ शकतात असे मत त्यांनी व्यक्त केलेय. आपण भाजी आणायला गेलो आणि त्या विक्रेत्याला वीस एक रुपयाची भाजी द्या असं म्हटलं तर चालेल का ? यामूळे मोठा गोंधळ निर्माण होऊ शकतो तेव्हा ही आणलेली नविन पद्धत अतिशय घातक असल्याचं मत त्यांनी नोंदवल आहे.

बदल केलेली सर्व पुस्तक रद्द करा

याचबरोबर छात्रभारतीचे मुंबईचे अध्यक्ष रोहीत ढाले यांनीसुद्धा बालभारतीने केलेल्या बदलाला विरोध करत नविन आणलेली ही पुस्तकं रद्द करुन टाकावी असं मत व्यक्त केल आहे. पुर्वापार चालत आलेल्या मराठी बोली भाषेत बदल करु नये. जोडाक्षर मराठी भाषेचा गाभा आहे त्यात बदल करुन मराठी भाषेच नुकसान करु नये अस म्हटल आहे.

बदल चांगला स्विकारा

मराठी सिने अभिनेता अतुल कुलकर्णी यांनी एका लेखाचा संदर्भ देत हा बदल चांगला असल्याचं म्हटल आहे तो आपण स्विकारायला हवा.‘जर प्रत्येक मुलाला गणित यायला हवे अशी आपली इच्छा असेल तर या बदलाचे स्वागत करावे लागेल असे लिहुन एका शिक्षण तज्ञ्याच्या लेखाचा संदर्भ देत त्यांनी या बदलाचं स्वागत केल आहे.

नुकत्याच उन्हाळ्याची सुटी संपुन शाळा सुरु झाल्यात. तेव्हा मुख्य प्रश्न आता हा आहे की हा नवा बदल शिक्षकवर्ग मुलांपर्यंत कसा पोहचवतात. याआधीसुद्धा शिक्षणप्रक्रीयेत अनेक बदल करण्यात आले. त्यातले काही स्विकारले गेले तर काही बदलांना मोठा विरोध झाला. तसाच विरोध आताही होतोय. तेव्हा हा नविन अभ्यासक्रम विद्यार्थ्याना पचनी पडतो की शिक्षण विभागाला यात पुन्हा जुन ते सोन म्हणत आहे तेच ठेवावं लागत हा महत्वाचा प्रश्न आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र आघाडीवर! – दादाजी भुसे

Aprna

विश्वास नांगरे पाटलांनी आणि शरद पवारांची घेतली भेट

News Desk

जर आपण कवडीमोलाची किंमत नसलेल्या नातवाचं ऐकलं असतं तर…अतुल भातखळकरांचे पवारांना प्रत्युत्तर

News Desk