HW News Marathi
महाराष्ट्र

उल्हासनगरात गरोदर महिलेसह बाळाचा मृत्यू ,डॉक्टरांवर कारवाई करण्यासाठी मृतदेहासह ठिय्या आंदोलन

उल्हासनगर (गौतम वाघ) : प्रसूतीसाठी आलेल्या महिलेसह तिच्या बाळाचाही मृत्यू झाल्याची घटना उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात घडलीये. या मृत्यूंना डॉक्टरांचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचा आरोप करत मृत महिलेच्या नातेवाईकांनी रुग्णालयात मृतदेहासह ठिय्या आंदोलन केलं.

आंबिवलीला राहणा-या आरती चव्हाण या महिलेला प्रसूतीवेदना होऊ लागल्यानं तिच्या पतीनं काल उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात तिला दाखल केलं. मात्र सायंकाळपर्यंत तिच्याकडे डॉक्टरांनी दुर्लक्ष केलं, तसंच सायंकाळी ऑपरेशन केल्यानंतर बाळाचा मृत्यू झाल्याची माहिती नातेवाईकांना देण्यात आली, तर यानंतर काही तासांनी आरतीची प्रकृती खालावल्याचं सांगत नंतर तिचाही मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली, हा मृत्यू डॉक्टरांनच्या हलगर्जीपणामुळेच झाल्याचा आरोप आरतीच्या पतीनं केला. यानंतर आरतीच्या मृत्यूचं नेमकं कारण शोधण्यासाठी मुंबईच्या जेजे हॉस्पिटलमध्ये तिचा पोस्टमॉर्टम करण्यात आलं. मात्र आज सकाळी दोषी डॉक्टरांवर कारवाईची मागणी करत आरतीच्या नातेवाईकांनी तिच्या।मृतदेहासह रुग्णालयात ठिय्या आंदोलन केलं. यानंतर रुग्णालय प्रशासनाने एका डॉक्टरला निलंबित केलं असून दुसऱ्या डॉक्टरच्या चौकशीचे आदेश दिलेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

तहसीलदार ज्योती देवरे यांच्या विरोधात तलाठी संघटना आक्रमक!

News Desk

पंकजा मुंडेंनी भाजपची कार्यकारणी जाहीर केल्यानंतर टीमचे केले अभिनंदन

News Desk

शरद पवारांच्या बेळगाव दौऱ्याच्या आठवणीवरून सुप्रिया सुळेंचा राज्य सरकारवर निशाणा

Aprna