HW News Marathi
महाराष्ट्र

अन्यथा शिवप्रेमींमध्ये असंतोष निर्माण होईल!

औरंगाबाद | मनसे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या पक्षाचा झेंडा बदलत असल्याची चर्चा चालू असताना ‘तुम्ही महाराजांच्या राजमुद्रेचा वापर पक्षाच्या झेंड्यावर वापरुन त्याचा अवमान करताय’, अशा आशयाचं पत्र आर.आर.पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष विनोद नारायण पाटील यांनी राज ठाकरेंना पाठवले आहे. पत्राच्या सुरुवातीला राज साहेबांना त्यांच्या राजकारणाच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देत माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार ‘तुम्ही झेंड्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या संकल्पनेतून साकारलेल्या राजमुद्रेचा वापर ध्वजावर करणार आहात हे ऐकून दुख झाले’, असं या पत्रात लिहीले आहे. ‘तुम्ही या राजमुद्रेचा वापर करुन स्वराज्याचा विचार हा मर्यादीत करत आहात’, असंही पुढे म्हटले आहे. तुम्ही राजमुद्रेचा वापर झेंड्याच्या निशाणीसाठी वापरुन अनेक शिवप्रेमींचा असंतोष पत्करताय असं म्हणत मुद्रा न वापरण्याची विनंतीही शेवटी पत्रातून केली आहे.

‘मनसे’चा नवा झेंडा नेमकी दिसणार कसा?

मनसेचा नवा झेंडा हा संपूर्णपणे भगवा असेल, अशी माहिती मिळाली आहे. झेंड्यात आता दुसऱ्या कोणत्याही रंगाचा समावेश नसेल. विशेष म्हणजे या नव्या झेंड्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा असेल. नव्या झेंड्यामध्ये मनसेचं जुनं निवडणूक चिन्हदेखील (रेल्वेचं इंजिन) नसेल. मनसेच्या या नव्या झेंड्याचं रुप पाहिलं, तर मनसे पूर्णपणे आक्रमक हिंदुत्वाच्या मार्गावर येत असल्याची चिन्हे दिसत आहे. कारण भगवा रंग आणि शिवरायांची राजमुद्रा त्याचेच संकेत देत आहेत.

आता आर.आर.पाटील फाउंडेशनच्या या पत्राचा विचार मनसे अध्यशक्ष राज ठाकरे करणार का? की आणखी कोणाच्या पत्रांतून त्यांना रोष पत्करावा लागणार याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे. दरम्यान येत्या २३ जानेवारीला मनसेच्या महाअधिवेशनात या अधिकृत झेंड्याची घोषणा राज ठाकरे करणार आहेत अशीही माहीती समोर आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सत्ता ही विनयाने वापरायची असते !

News Desk

राष्ट्रवादी आमदाराच्या वडिलांना ‘कृषीरत्न पुरस्कार’ जाहीर, मुलाने ‘असं’ केलं अभिनंदन

News Desk

मराठा आरक्षण : श्रेय घेण्यासाठी शिवसेनेने काहीच केले नाही !

News Desk