HW Marathi
कृषी कोकण

‘कोकण कपिला’ नावाने होणार कोकणातील देशी गायींची नोंदणी

दाभोळ | डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ येथील पशुसंवर्धन आणि दुग्धशास्त्र विभाग आणि राष्ट्रीय पशू आनुवंशिक संसाधन ब्युरो, कर्नाल, हरियाना यांनी कोकणातील स्थानिक गायीचे सर्वेक्षण करून संशोधन करण्यात आले होते. संशोधनातून कोकणातील स्थानिक गायीमध्ये भारतातील गायीच्या इतर जातींपेक्षा वेगळेपणाची नोंद करण्यात आली. या गायींची अनुसंधान परिषद यांच्या राष्ट्रीय पशू आनुवंशिक संसाधन ब्युरो यांनी ‘कोकण कपिला’ या नावाने नवीन गायींच्या जातीची नोंदणी केली आहे. यामुळे विद्यापीठाच्या शिरपेचात आणखी एक तुरा रोवला गेला आहे.

या गायीच्या जातीमध्ये कोकणातील उष्ण-दमट आणि अति पावसाच्या हवामानात, डोंगराळ भागात चराई करून पोषण आणि उत्पादन करण्याची अधिक क्षमता आहे. या जातीची जनावरे तपकिरी, काळा अथवा पांढरा, भूरा आणि मिश्र अशा विविध रंगाची आहेत. जनावरे लहान ते मध्यम आकाराची, घट्ट बांध्याची असून 250 ते 350 किलो वजनाची असतात.

डोके मध्यम असून त्यावर लहान आकाराचे प्रथम वर नंतर मागे वळलेली सरळ टोकदार शिंगे, चेहरा सरळ, कान मध्यम आकाराचे सरळ समांतर रेषेत असतात. डोळे, मुस्कट, खूर आणि शेपटीचा गोंडा सहसा काळ्या रंगाचा असतो. लहान ते मध्यम आकाराचे वशिंड आणि मानेखाली लोंबकणारी पोळ (आयाळ) असते. रोगप्रतिकारक शक्ती चांगली आणि काटकपणा असल्याने रोगास बळी पडण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. स्वभावाने गरीब, शांत असतात, गाईची कास लहान असून सड लहान ते मध्यम आकाराचे असतात. उपलब्ध स्थानिक गवत आणि भात पेंढ्यांवर गायीचे सरासरी दूध उत्पादन 2.25 किलो दरदिवशी असते. बैल काटक, शेतीसाठी आणि ओढकामास उपयुक्त आहेत.

जनुके इतर जातीपेक्षा भिन्न
या गायींची जनुके महाराष्ट्रातील गायीच्या इतर जातीपेक्षा भिन्न आहेत. अशी या नवीन नोंदणी करण्यात आलेल्या गाईची वैशिष्ट्ये असल्याची माहिती विद्यापीठातर्फे देण्यात आली आहे.

Related posts

जलयुक्त शिवार अभियान, नरेगा कामांच्या नियोजनाकडे लक्ष द्या – जिल्हाधिकारी डोंगरे

News Desk

शेतक-याने दिल्या जानकरांना शिव्या

News Desk

 दूध संकलन बंद केल्याने शेतकरी संतप्त

News Desk