HW News Marathi
मनोरंजन

नेहरुंच्या व्हायरल फोटोमागचे काय आहे सत्य…

स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु हे यांच्या बाबत सोशल मिडीयावर अनेकदा प्रतिमा मलिन करणा-या पोस्ट प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेल्या पहायला मिळतात. भाजपाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालविया यांनी ट्विटरवरुन पंडित नेहरुंविषयी ट्विटकरत नेहरुंचे महिलांसोबतचे फोटो शेअर करत त्यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र नेटीझन्सनी त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल केले होते. मुख्यत: दरवर्षी बालदिनाच्या दरम्यान सोशलमिडीयावर हे फोटो चर्चेचा विषय ठरतात. जाणून घ्या काय आहे या फोटो मागचे सत्य…

सोशल मिडीयावर नेहरूंची जीवन शैली नेहमीच चर्चेचा विषय ठरली आहे. यंदाही सोशल मीडियावर एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या फोटो बाबत असा दावा केला जात आहे. सदर फोटोमध्ये पंडित नेहरू आणि एडविना माउंटबॅटन हे दिसत आहेत. या दोघांच्या फोटोबाबत भूतकाळात, प्रेम-संबंध असल्याची देखील चर्चा झाली.

फोटो १

फोटो वास्तविक आहे ही गोष्ट खरी आहे , परंतु त्यातले दोन लोक नेहरू आणि एडविना नाहीत. हा फोटो हावर्ड ब्रेनन यांच्या “ड्रॉइंग द लाइन” या नाटकाचा आहे. या नाटकामध्ये नेहरू आणि एडविनाची भूमिका निश्चित होती. त्यामुळे हे कलाकार आपल्याला त्या वेशभुषेत दिसत आहेत. अभिनेता सीलास कार्सन नेहरूंच्या भूमिकेत होते. तर, एडविनची भूमिका लुसी ब्लॅकने साकारली होती. हा फोटो लंडनच्या स्टीरिओ ड्रामाचा आहे. हॉवर्ड ब्रेनन यांचे नाटक भारताच्या विभाजनच्या इतिहासाच्या पार्श्वभूमीवर आधारीत होते.

फोटो २

पंडित नेहरुंचा व्हायरल होणारा हा फोटो आणि त्यावर असेलेला लिखीत मजकूर पंडित नेहरुंची बदनामी करणारा आहे. या फोटोवर लिहलेला मजकूर अत्यंत गलिच्छ असून नेहरुंना कुत्र्याची उपमा देण्यात आलेली आहे. तसेच स्वतंत्र भारताची लढाई लढताना नेहरुंनी गलिच्छपणाची हद्द पार केल्याचे या मजकूरात म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आषाढ महिन्यातल्या दीपपूजेविषयी थोडक्यात… 

News Desk

कलावंत हीच माझी जात | नाना पाटेकर

News Desk

संगीत सम्राट पर्व २चा विजेता आज ठरणार

News Desk