HW News Marathi
Covid-19

बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खानला कोरोनाची लागण

मुंबई | बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खानला कोरोनाची लागण झाली आहे. शाहरुख खानला कोरोना झाल्याची माहिती आज (५ जून) फिल्मफेअरच्या ट्वीटर हँडलवर माहिती दिली आहे. नुकतेच बॉलिवूडमधील अभिनेत्री कतरिना कैफ कैफ, आदित्य रॉय कपूर आणि अभिनेता कार्तिक आर्यन यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळाली. गेल्या आठवड्यापूर्वी दिग्दर्शक करण जोहर यांनी ५० वा वाढदिवस साजरा केला. करण जोहरच्या बर्थडे पार्टीमध्ये मोठ्या संख्येने बॉलिवडूमधील दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती. यामुळे बर्थडे पार्डीमुळे बॉलिवूडमधील कोरोनाच सुपर स्प्रेडर इव्हेंट झाल्याच्या चर्चा मनोरंजक विश्वास रंगल्या आहेत.

दरम्यान, शाहरुख खानला दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. यापूर्वी शाहरुख खानला ‘पठाण’ सिनेमाच्या शूटिंग सुरु असताना कोरोनाची लागण झाली होती. कतरिना कैफ आता कोरोनामुक्त झाल्याची माहिती मिळाली आहे. ‘बॉलिवूड हंगमा’च्या रिपोर्टनुसार करण जोहरच्या पार्टीस आलेल्या बॉलिवूड सेलिब्रिटीमध्ये जवळपास ५०-५५ जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळाली आहे. या पार्टीनंतर खुद करण जोहरला देखील कोरोनाची लागण झाल्याची सांगतिले असून करण जोहरची बदनामी होऊ नये म्हणून त्यांनी कोरोनाची लागण झाल्याची माहिती लपवली आहे. 

सध्या देशासह राज्यात कोरोना पुन्हा डोकेवर काढत आहे. देशात गेल्या २४ तासात ३ हजार ९६२ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. देशातील महाराष्ट्र, तामिळनाडू, तेलंगाना आणि कर्नाटकमध्ये दररोज कोरोना रुग्णांच्या संख्ये वाढ होत आहे. बॉलिवूडमध्ये अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता कार्तिक आर्यन या दोघांना देखील कोरोनाची लागण झाली आहे.

Related posts

मोदींच्या भेटीआधी अजित पवार, शरद पवार ठाकरेंच्या भेटीला वर्षावर !

News Desk

कोरोनाच्या विळख्यात सापडलेल्या देशांच्या यादीत भारत सहाव्या क्रमांकावर

News Desk

यंदा १ जूनलाच मान्सून केरळमध्ये होणार दाखल, हवामान विभागाचा अंदाज

News Desk