HW News Marathi
Covid-19

किरीट सोमय्यांनी देवाला साकडं घालावं; गुलाबराव पाटलांचा सोमय्यांना सल्ला

जळगाव | कोविड सेंटर हे ठाकरे सरकारच्या कामईचं साधन आहे. येत्या १० दिवसांत ठाकरे सरकारचा कोविड सेंटर घोटाळा उघड करणार, असा दावा भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. सोमय्या यांनी आज मुंबईतील दहिसर, बीकेसी आणि नेस्को कोविड सेंटरला भेट दिली. त्यानंतर त्यांनी ठाकरे सरकारचा कोविड सेंटर घोटाळा बाहेर काढण्याचा इशारा दिला आहे. तर त्यांच्या या इशाऱ्याला आता शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. सोमय्यांनी बोलताना भान ठेवलं पाहिजे, कोरोना काय कामईचं साधन आहे का? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

पाटील म्हणाले, राज्य सरकारवर आरोप करण्यासाठी विरोधी पक्षातील नेते जणू खिशातच कोरोना घेऊन फिरतात. पण, कोरोना काय कमाईचं साधन आहे का? सध्या राज्य सरकारला कोरोनावरुन काहीही बोलायचं आणि वाट्टेल ते आरोप करायचे असे प्रकार सुरू आहेत. जिल्हा रुग्णालय काय कमाईचं साधन नाही. कोरोना महामारीसारख्या काळात लोकांनी सेवाभावी वृत्तीने शासनाला मदत केली आहे. त्यामुळे सोमय्यांसारख्या माणसाने अशा प्रकारे आरोप करणे योग्य नाही. त्यांनी बोलताना जरा भान ठेवून बोलावं, असं पाटील म्हणाले. त्याचबरोबर त्यांनी यावेळी सोमय्यांना देवाला साकडं घालण्याचा सल्लाही दिला आहे. सोमय्यांनी कोरोना जाऊ दे म्हणून देवाला साकडं घालावं, असं पाटील म्हणाले.

किरीट सोमय्यांचा दावा

किरीट सोमय्या यांनी येत्या दहा दिवसात ठाकरे सरकारचा कोविड सेंटर घोटाळा बाहेर काढणार असल्याचा दावा केला आहे. आर्थिक कमाईसाठी ठाकरे सरकार लोकांना घाबरवण्याचं काम करत आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या जरी वाढत असली तरी कोविड सेंटर्स रिकामे आहेत, असंही त्यांनी म्हंटलंय. ते म्हणाले, सोमय्या म्हणाले, बीकेसीमध्ये २,४०० बेड्सपैकी ८०० बेड्सवर रुग्ण दाखल झाले आहेत. तर दहिसरमध्ये ७५० बेड्स आहेत. मात्र, अजून एक पण रुग्ण दाखल नाही. गोरेगावच्या नेस्कोमध्ये २ हजार बेड्सपैकी ९०० रुग्णांनी बेड्स भरले आहेत. यावरून ९८ टक्के रुग्ण तर आपल्या घरीच राहून किंवा नर्सिंग होममध्ये उपचार घेत आहेत, असे स्पष्ट होते. तर ज्यांचं लसीकरण झालं आहे, त्यातील ९९.९९ लोक हे सुरक्षित आहेत, अशी माहिती सोमय्यांनी दिली.

पुढे ते म्हणाले, महाविकास आघाडी सरकारमधील नेते आणि त्यांच्यासोबत काही आयएएस अधिकारी यांच्याकडून लोकांना घाबरवण्याचे काम सुरू आहे. कारण कोविड सेंटर हे त्यांच्यासाठी कमाईचं साधन आहे, असा आरोप करत येत्या दहा दिवसात ठाकरे सरकारचा कोविड सेंटर घोटाळा जनतेसमोर आणणार असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. तसेच या सगळ्या घोटाळ्यांचे कागदपत्र मी जनतेला दाखवणार असंही त्यांनी यावेळी सांगितलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

खासदार सुप्रिया सुळेंनी स्वीकारली कोरोनामुळे अनाथ झालेल्या २ चिमुकल्यांची जबाबदारी

News Desk

राज्यात कोरोना रुग्णसंख्येचा उच्चांक, १४,४९२ नवे रुग्ण आढळले

News Desk

बीडमध्ये कोरोनाचा पहिला बळी, ६५ वर्षिय महिलेचा मृत्यू

News Desk