HW Marathi
क्राइम

आमदारांच्या मुलीवर प्रियकराकडून प्राणघातक हल्ला

पी.रामदास

पुणे – एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला झाल्याचा प्रकार पुण्यातील वाकड परिसरात उघडकीस आला आहे. अश्विनी संजीव बोदकुरवार असे जखमी तरुणीचे नाव असून ती यवतमाळ जिल्ह्यातील वणीचे आमदार संजीव बोदकुरवार यांची कन्या आहे.

अश्विनी पिंपरी चिंचवड येथील बालाजी महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. सकाळी आठ वाजता तिच्यावर राजेश बक्षी नावाच्या तरुणाने चाकू हल्ला केला या हल्ल्यात अश्विनी थोडक्यात बचावली असून तिच्या हाताची बोटे कापली गेली आहेत. हल्लेखोराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. एकतर्फी प्रेमातून हा हल्ला झाल्याची माहिती समोर येत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोघेही एकाच कॉलेजमध्ये शिकायचे. राजेश हा हरियाणा राज्यातील असल्याची माहीती समोर येते.

Related posts

गतीमंद मुलीवर उत्तर भारतीय तरुणाने केला बलात्कार

News Desk

नांदेड पोलीसांनी प्रतिज्ञा घेऊन दहशदवाद व हिंसाचार विरोधी दिवस साजरा केला

News Desk

अनिल परब यांचे म्हणणे ऐकू- उच्च न्यायालय

News Desk