HW News Marathi
क्राइम

जेष्ठ आंबेडकर विचारवंत डॉ. कृष्णा किरवले यांचा खून

कोल्हापूर : जेष्ठ आंबेडकर विचारवंत, लेखक व शिवाजी विद्यापीठातील मराठी विभाचे माजी प्रमुख डॉ.कृष्णा किरवले यांचा खून झाल्याची घटना समोर आली आहे ही घटना शुक्रवारी दुपारी राजेंद्रनगर येथील त्यांच्या राहत्या घरी बेडरूममध्ये घडली आहे .या घटनेनंतर कोल्हापूरात एकच खळबऴ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून या प्रकरणाचा तपास करत आहेत. दरम्यान, फर्निचरचे पैसे न दिल्याच्या रागातून त्यांचा खून झाल्याची प्राथमिक माहिती मिळते.

डॉ. कृष्णा किरवले यांनी आपल्या लिखाणाच्या माध्यमातून आंबेडकरांच्या विचारांचा देशभर जागर केला. तसेच, ते शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागाचे माजी प्रमुख होते. आंबेडकरी तत्त्वज्ञान, चळवळ व दलित साहित्याच्या भाष्यकारांमध्ये एक अग्रगण्य नाव म्हणून त्यांना ओळखले जात होते. डॉ. कृष्णा किरवले यांनी औरंगाबाद येथील मिलिंद कॉलेजमधून शिक्षण घेतले. त्यांच्यावर आंबेडकरी चळवळीचे संस्कार तेथेच झाले. 1967 पासून आंबेडकरी ऊर्जा देणा-या डॉ. गंगाधर पानतावणे संपादित अस्मितादर्श या वाङमयीन नियतकालिकातून त्यांच्या एकूणच व्यक्तिमत्वाची जडणघडण झाली.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पोलिसांनी सर्वसामान्य नागरिकांशी सौजन्याने वागावे – पोलीस उपायुक्त सुनील भारद्वाज

News Desk

एकाच्या अंगावर पेट्रोल ओतून जिवंत जाळण्याचा प्रयत्न

swarit

संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी; न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष

Aprna