HW News Marathi
क्राइम

ट्रक व मॅजिक धडकेत २ ठार ४ जण गंभीर जखमी 

उत्तम बाबळे

नांदेड :- भोकर – नांदेड महामार्गावरील माै.ताटकळवाडी ता.भोकर शिवारात मालवाहू आयचर ट्रक व प्रवासी वाहू मॅजिक वाहनाच्या झालेल्या धडकेत २ जण ठार तर ४ जण गंभीर जखमी झाले असून या अपघात प्रकरणी आयचर ट्रक चालका विरुद्ध भोकर पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दि.२६ एप्रिल २०१७ रोजी पहाटे ३:३० वाजताच्या दरम्यान तरोडा (बु.)नांदेड येथील कबड्डी खेळाचे सामने पाहून भोकर – तामसा मार्गे माै.लिमटेक ता.हदगाव येथील रहीवासी असलेले काही जण प्रवासी वाहू मॅजिक वाहन क्र.एम.एच.२६ ए.के.४८१५ ने गावाकडे जात असतांना भोकर – नांदेड महामार्गावरील माै.ताटकळवाडी शिवारातील गदा मारुती हनुमान मंदीरा जवळ समोरुन भरधाव वेगात येत व असलेल्या नांदेडकडे जात असलेल्या मालवाहू आयचर ट्रक क्र.एम.एच.२८ ए.बी.७९९७ ने जोराची धडक मॅजिक वाहनाला दिली.झालेल्या या भिषण अपघातात मॅजिक मधिल प्रवासी संदिप भिसे (२८) रा.लिमटेक हे जागीच ठार झाले आणि गंभीर जखमी सिताराम वानोळे(३५) रा.लिमटेक यांचा नांदेज येथे उपचारा दरम्यान मृत्यु झाला.तसेच याच गावचे रहीवासी असलेले अन्य ४ जण ही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर नांदेड येथील शासकिय रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. या अपघात प्रकरणी लक्ष्मण वानोळे (३३) रा.लिमटेक यांनी फिर्याद दिल्यावरुन आयचर ट्रक चालकाविरुद्ध अपघात व मृत्युस कारणीभुत झाल्यासह मोटार वाहन कायदा भादवि नुसार भोकर पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ट्रक चालक फरार झाला असून पुढील अधिक तपास पो.नि.संदिपान शेळके हे करत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

तरुणीचे शौचालयातील क्लिप व्हायरल करणारा अटकेत

News Desk

मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाने मुंबई विभागातून सर्वाधिक म्हणजे 615 मुलांची केली सुटका

Aprna

“एकाच घरावर कितीवेळा छापे मारणार?”- जयंत पाटील

News Desk