HW News Marathi
क्राइम

ट्रेनमध्ये मुलींचे चोरून फोटो काढणारा जेरबंद

मुंबई – ‘हावडा मालदा इंटरसिटी एक्स्प्रेस’मधला एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावरून महिला किती असुरक्षित आहेत, याची कल्पना येते.

कोलकात्यामधल्या दोन मुलींनी फेसबुकवर एक व्हिडिओ अपलोड केला. या मुली ट्रेनने प्रवास करत होत्या. तेव्हा त्यांच्याविरुद्ध दिशेला बसलेला एका प्रवासी चोरून त्यांचे व्हिडिओ आणि फोटो काढत होता. यातल्या एका मुलीच्या ते लक्षात आले आणि तिने त्याचा फोन खेचून घेतला. पण आपण फोटो काढतच नसल्याचा कांगावा करायला त्याने सुरुवात केली. शेवटी हे प्रकरण पोलिसांकडे नेण्यात आले. पण पोलिसांकडे गेल्यावर या दोन्ही मुलींना यापेक्षाही वाईट अनुभव आला.

पोलिसांनी या व्यक्तीच्या मोबाइलमधले फोटो तपासले तेव्हा त्यांना या फोटोत काहीच आक्षेपार्ह वाटलं नाही, असंही या मुलीने एका इंग्रजी बेवसाईटला दिलेल्या माहितीत सांगितले. इतकंच नाही तर तुम्ही चांगल्या घरातल्या मुली असून तक्रारारीच्या भानगडीत का पडता? त्यापेक्षा घरी जा असा फुकटचा सल्लाही पोलिसांनी दिला असल्याचा आरोप या मुलींनी केला आहे. पण या मुली मागे हटल्या नाहीत, त्यांनी रेल्वे पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

या मुलीच्या पाठीवरचा टॅट्यू आपल्याला आवडला म्हणून आपण तिचे व्हिडिओ शुटिंग करत असल्याचे या तरुणाने नंतर पोलिसांसमोर कबूल केले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, या तरुणावर पोलिसांनी कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

धावत्या रेल्वेत तरुणांकडून छेडछाड, मायलेकींनी मारली रेल्वेतून उडी

News Desk

अनिल देशमुखाना मोठा दिलासा! जामीनाविरोधातील CBIची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

Aprna

सारा तेंडूलकर शरद पवारांवर टिका करते तेंव्हा….

News Desk