HW News Marathi
क्राइम

भाजपा नगरसेवकावर बलात्काराचा गुन्हा

मुंबई – मिरा रोड येथील भाजपाचे नगरसेवक आणि प्रभाग समितीचे सभापती अनिल भोसले यांच्यावर काशिमीरा पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. पीडित महिलेच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली आहे.

पीडित महिला ही अनिल भोसले याच्या मित्राची पत्नी आहे. दोघांची ओळख होती. पीडित महिला आणि तिच्या पतीची घरगुती कारणावरून भांडणे होत असत. त्यावेळी भोसले समजूत काढत असे. त्याचा गैरफायदा घेऊन त्याने पीडित महिलेला ठाणे-नाशिक रोडवरील लॉजवर नेऊन तिच्या मुलाला जिवे ठार मारण्याची धमकी दिली आणि बलात्कार केला. फोटोही काढले आणि हा प्रकार कुणालाही सांगितला, तर फोटो सोशल मीडियावर टाकण्याची धमकी दिली, असे या संदर्भात काशिमीरा पोलिसांनी सांगितले.

मात्र हे प्रकार असह्य झाल्यावर पीडित महिलेने पोलिसांकडे भोसले याच्याविरोधात तक्रार दिली. चौकशी करून काशिमीरा पोलिसांनी भादंवि कलम ३७६, ३७७ आणि ५०६ अन्वये अनिल भोसलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सासरच्यांनी जादुटोणासाठी सुनेचे मासिक पाळीतील रक्त विक्रीवर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया म्हणाले…

News Desk

आत्महत्ये ऐवजी आईची हत्या

News Desk

औषध देण्याच्या बहाण्याने विवाहितेवर भोंदू बाबाचा बलात्कार

News Desk