HW News Marathi
क्राइम

माळाकोळीच्या शालेय परिसरातील तंबाखू विक्रेत्यांविरोधात दंडात्मक कार्यवाही

उत्तम बाबळे

नांदेड – लोहा तालुक्यातील माळाकोळी इथल्या शालेय परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ खुलेआम विक्री होत होती. विद्यार्थी व अल्पवयीन मुलांचे आरोग्य धोक्यात आल्याने अनेकांच्या तक्रारी वाढल्यावरुन पोलीस व आरोग्य विभागाच्या संयुक्त पथकाने या विक्रेत्यांविरोधात जोरदार मोहीम उघडून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली आहे.

राज्य शासनाने तंबाखूजन्य पदार्थ अर्थात सितार,गोवा,आर.एम.डी.व अन्य पुड्या विक्रीस बंदी घातली आहे.परंतू शासनाने पोलीसांना या विक्रेत्यांवर कार्यवाहीचे करण्याचे पुर्णत: अधिकार न देता अन्न व भेसळ विभागास दिले असल्याचा पुरेपूर फायदा ते घेत खुलेआम सर्रास विक्री मोठ्या प्रमाणात करत आहेत.

अशाच प्रकारे लोहा तालुक्यातील माळाकोळी येथील जिल्हा परिषद शाळा परिसरात तंबाखू विक्रीस बंदी असतानाही तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री मोठ्या प्रमाणात करण्यात येत होती.यामुळे शालेय विद्यार्थी व अल्पवयीन मुलांना तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ खान्याची सवय लागत होती.अनेकांचे आरोग्य बालवयातच धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली होती.यामुळे अनेक पालकांसह आरोग्यप्रेमी नागरिकांकडून तक्रारी वाढल्या होत्या.

याची दखल घेऊन जिल्हा रुग्णालय व माळाकोळी पोलीस स्टेशनच्या पथकांनी संबंधित तंबाखू विक्रेत्यांविरुद्ध १५ मे २०१७ रोजी एक मोहिम राबविली आणि तंबाखू नियंत्रण कायदान्वये काही विक्रेत्यांविरुद्ध दंड आकारुन शाळा परिसरात तंबाखू विक्री करण्यास बंदी घातली.ही दंडात्मक कार्यवाही करणा-या पथकामध्ये जिल्हा रुग्णालयातील अधिकारी डॉ. दीपक हजारी, डॉ. रोशनी चव्हाण, समुपदेशक प्रकाश आहेर, सुवर्णकार सदाशीव व माळाकोळी पोलीस स्टेशनचे पोलीस हे.कॉ. आर. पी. कदम यांचा सहभाग होता. अन्न व भेसळ अधिका-यांच्या सहभागाविना ही कार्यवाही केल्यामुळे अनेकांनी कौतुक केले असून बंदी असलेल्या तंबाखूजन्य पदार्थ विक्री व तस्करीवर आळा घालण्यासाठी गावोगाव अशीच कारवाई व्हावी अशी नागरिकांची मागणी आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“… व्हायरल होतात ते मी कसे थांबवू”, उर्फी जावेदचा पोलिसांनाच उलट सवाल

Aprna

गोव्यातील कार अपघातात पुण्यातील एक ठार

News Desk

दोन सख्या बहिणींना ब्लॅकमेल करून केला बलात्कार

News Desk