HW News Marathi
क्राइम

वाशिम येथील दरोडेखोर अटक

विनोद तायडे

वाशिम :

वाशिम जिल्हा 3 महिन्यापासून दरोडेखोरामुळे हादरला होता दरोडेखोरांचा तपास लावण्याचे आव्हान वाशिम पोलिसांसमोर उभे राहले अखेर स्थानिक गुन्हे शाखेने वाटमारीचा तपास लावून टोळीला जेरबंद केली

जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी या घटनेचा छडा लावण्याची जबाबदारी स्थानिक गुन्हे शाखेकडे दिली. गुन्हे शाखेने डिजीटल तंत्राच्या सहायाने तपास सुरु केला़ पुणे जिल्ह्यातील चाकन,तळेगाव दाभाडे परिसर पिंजून काढल्यानंतर बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव येथून या टोळीला जेरबंद करण्यात या पथकाला यश आले़….

वाशीम तालुक्यातील प्रभु उर्फ हनुमान गोरे, तुकाराम गोरे, नितीन हिवराळे, काशिनाथ गोरे, सुनील कंकाळ तसेच रिसोड तालुक्यातील वाकद येथील प्रमोद काशिराम मुके यांना शेगाव येथून ताब्यात घेऊन त्याच्याकडून एक लाखाच्यावर मुद्देमाल जप्त केला आहे तसेच चोरट्यांनी मालेगाव,मंगरुळपीर तसेच वाशीम तालुक्यात वाटमारी केल्याची कबुली दिली़

सदर कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक, सहायक पोलिस उपनिरीक्षक किरणकुमार साळवे यांच्या पथकाने केली

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Online Loan App च्या माध्यमातून अवाजवी वसूली करणार्‍या आंतरराष्ट्रीय टोळीचा सायबर गुन्हे शाखेकडून पर्दाफाश

Manasi Devkar

वाशिम जिल्ह्यात ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात

News Desk

औरंगाबादमधील जैन मंदिरातून दोन किलो सोन्याची मूर्ती लंपास; पोलिसांकडून शोध सुरू

Aprna