HW News Marathi
क्राइम

अंधश्रद्धेचा फायदा घेऊन व्यावसायिकाला गंडा

साडेतीन लाखांना फसवणाऱ्या मांत्रिकास अटक

मंबई कधीदागिने पॉलिश करण्याच्या बहाण्याने, तर कधी पोलिस असल्याच्या बहाण्याने नागरिकांना लुटण्याच्या घटना घडत असतात. या सर्व पद्धतींची माहिती नागरिकांना झाल्यामुळे की काय, या भामट्यांनी आता लोकांच्या अंधश्रद्धेचा फायदा घेत, मांत्रिकांच्या वेषात येऊन चोऱ्या करण्यास सुरुवात केली आहे. अशा तऱ्हेने पूजेच्या नावाखाली एका व्यावसायिकाला साडेतीन लाख रुपयांना गंडा घालणाऱ्या एका मांत्रिकाला मालाड पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. अब्दुल गफूर अब्दुल माजिद शेख (४८) असे त्याचे नाव आहे.

मालाड परिसरात राहणाऱ्या कार्डर मुरगन या व्यावसायिकाला काही दिवसांपूर्वी एका मांत्रिकाचा फोन आला. मुरगन यांचे व्यवसायात नुकसान झाल्याचा अंदाज घेऊन या मांत्रिकाने त्यांना वेगवेगळे सल्ले दिले. त्यामुळे प्रभावित होऊन मुरगन यांनी त्याला थेट घरी बोलावले. मुरगनचा विश्वास जिंकण्यासाठी मांत्रिकाने मुरगन यांच्या घरी येऊन छोटी पूजा घातली. त्यानंतर धनलाभ आणि व्यवहारात नफ्यासाठी त्याने मुरगन यांना आणखी एक पूजा घालण्यास सांगितले. पूजेसाठी २ लाख रुपये आणि ५५ तोळे सोनेही ठेवण्यास सांगितले. पैशांची चणचण असल्यामुळे मुरगन यांनी हे पैसे आणि दागिने मित्रांकडून जमा करत पूजा घातली. पूजेवेळी मांत्रिकाने घरात होम करून धूर केला. या धुराने मुरगन दाम्पत्य बेशुद्ध पडल्यानंतर मांत्रिकाने पैसे आणि सोने घेऊन पळ काढला. या फसवणुकीबाबतची माहिती मुरगन यांनी मित्रांना देत सावध राहण्याचे आवाहन केले होते. तसेच मालाड पोलिसांत तक्रारही नोंदवली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मंजुळा शेट्ये हत्येप्रकरणी महिला कर्मचऱ्यास पोलीस कोठडी, पाच अटकेत

News Desk

बच्चू कडूंना न्यायालयने जामीन मंजूर केल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात बोलताना म्हणाले…

Aprna

पती आणि पत्नीमध्ये वाद, फेसबुकवर सुसाइड नोट पोस्ट करून पतीने केली आत्महत्या

News Desk