HW News Marathi
क्राइम

गावठी हातभट्टीवर छापा

 

विनोद तायडे

वाशीम -वाशिम जिल्ह्यातील

अनसिंग पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मोहगव्हाण येथे जिल्हा पोलीस आणि एलसीबी एकत्रीत रित्या गावठी दारू अड्यावर छापा टाकून १ लाख ९२ हजार रुपयांचा माल जप्त केले आहे . एका हप्त्यात दोनदा करण्यात आल्याने या भागात मोठ्या प्रमाणात दारू अड्डे असल्याचे समोर आले आहे. 1 एप्रिलला एलसीबीनी छापा टाकून 1 लाख तीन हजार सातशे पन्नास रुपयांचा माल जप्त केला होता. त्यानंतर त्याच शिवारात पोलीस अधीक्षक कारवाई केल्याने अवैद्य धंद्यावाल्यांचे धाबे दणाणले आहे

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार मोहगव्हाण येथे मोठ्या प्रमाणात गावठी दारु तयार केली जात असल्याची गुप्त माहिती मिळाली. जिल्हा पोलीस अधिक्षक प्रशांत होळकर यांनी पुढाकार घेत स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.हेमंत गिरमे व कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन मोहगव्हाण येथील धरणाजवळ जंगलामध्ये गेले असता काही इसम गावठी हातभट्टी गाळीत असल्याचे दिसून आले. यावेळी पोलीसांनी उस्मान हुसेन नंदावाले, तुकड्या खैरु औरंगाबादी,नजीर रशीद नंदावाले, जैमीन पिरु नंदावाले यांच्या गावठी दारू अड्ड्यावर छापा टाकून सडवा मोहा एकूण ३ हजार ४५ लिटर व ५०१ लिटर गावठी हात भट्टी दारु एकूण १ लाख ९२ हजार ६२० रुपयांचा माल जप्त केले आहे. यावेळी अकबर शब्बीर औरंगाबादी याला अटक करून आरोपींविरुध्द पो.स्टे. अनसिंग येथे मुंबई प्रोव्हीशन अँक्ट कलम ६५ (फ) प्रमाणे गुन्हा दाखल केली. जिल्हा पोलीस अधिक्षक प्रशांत होळकर यांच्यासह सदर कारवाई पो.नि.गिरमे, पो.हे.काँ. नारायण जाधव, संजय नंदकुले, लक्ष्मण कोल्हे, प्रदीप चव्हाण, प्रकाश सरनाईक, पो.शि.बालाजी बर्वे, चालक पो.हे.काँ. आत्माराम राठोड आदींनी केली .

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शेकत-यांनी केली तहसील कार्यालयात आत्महत्या

News Desk

गुन्हेगारांना फोडून काढा-विश्वास नांगरे-पाटील

News Desk

दुसरे लग्न करणा-या नवरोबासह सासू-सासना अटक

News Desk