HW News Marathi
क्राइम

चोरांनी केली पोलीसांवर दगडफेक

गौतम वाघ

चोरटयांचा पाठलाग, ७ जणांवर झडप

अंबरनाथ – नवीन बिल्डींगच्या कंस्ट्रक्शनच्या ठिकाणी लोखंडी सळया चोरी करित असणा-या सातजणांच्या टोळीने पोलीसांवर दगडफेक करीत पळण्याचा प्रयत्न करत असताना पोलीसांनी थरारक पाठलाग करुन. सातजणांच्या टोळीला मुददेमालासह झडप घालून ताब्यात घेतल्याची घटना अंबरनाथमध्ये घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे ए.एस.आय. काटवटे व पोलीस कॉन्स्टेबल गोडबोले हे आनंदनगर पोलीस चौकी परिसरात रात्री बीट मार्शल करत होते. त्यावेळी रात्री अडीजच्या सुमारास अंबरनाथ पूर्व येथील रॉयल पार्क जवळ नवीन बिल्डींगच्या कंस्ट्रक्शनच्या ठिकाणी काही टोळी लोखंडी सळया चोरी करून ट्रकमध्ये भरत असताना पोलीसांनी पाहिले. त्यांना हटकले असता त्या सातजणांच्या टोळीने पोलीसांवर दगडफेक केली. त्यात पोलीस बालबाल बचावले. त्यांनी या घटनेची खबर डीबी पथकातील पोलीस कॉन्स्टेबल भोसले, खेडकर, पोलीस हवालदार निरगुडा यांना देताच त्यांनी त्वरित त्याठिकाणी येवून चोरटयांचा थरारक पाठलाग करुन. पोलीसांनी १ लाखाच्या लोखंडी सळया, १० लाखाचा ट्रक असा ११ लाखाचा मुददेमाल जप्त करून इशरार मण्यार (५५), प्रल्हाद शिंदे (३३), दिलीप गोडबोले (२७), पप्पू चंदाणे (३०), संतोष शिंदे (३०), अमर तायडे (२६), विष्णू परधने (४०)या सातजणांना ताब्यात घेतले. पंकज भानुशाली याने दिलेल्या फिर्यादीवरून त्या सातजणांविरूध्द शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार निरगुडा करीत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सोलापूरातील इफेड्रीन प्रकरणाचे पाकिस्तानी कनेक्शन

News Desk

माहुरमध्ये १३ लाख रूपये किमतीचे गुटखा जप्त   

News Desk

HW Exclusive : उद्योगपती अनिल अंबानींच्या अडचणीत वाढ; 250 कोटींचं कर्जफेड प्रकरणात समन्स

Chetan Kirdat