Site icon HW News Marathi

ठाकरे गटातील सुषमा अंधारे यांच्यासह ‘या’ पाच नेत्यांवर चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

मुंबई | महाप्रबोधन यात्रेत (Maha Prabodhan Yatra) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पाच नेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात ठाकरे गटाच्या प्रवक्ता सुषमा अंधारे (Sushma Andhare) , खासदार विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव, मधुकर देशमुख आणि अनिता बिर्जे या नेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या नेत्यांनी महाप्रबोधन यात्रेत प्रक्षोभक आणि चिथावणीखोर वक्तव्य केल्या प्रकरणी पाच नेत्यांवर गुन्हा दाखल केला आहे.

या यात्रेदरम्यान सुषमा अंधारेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नक्कील केली तर भास्कर जाधव यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मिमिक्री केली. या पाच नेत्यांना कलम 153 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यात पाच जणांव गुन्हा दाखल केला आहे. ठाणे नौपाडातील शिंदे गटाचे उपविभागप्रमुख बाळा गवस यांनी महाप्रबोधन यात्रेत प्रक्षोभक, चिथावणीखोर आणि नेत्यांबद्दल अवमानजनक शब्द वापरल्या ठाकरे गटाच्या पाच नेत्यांवर गुन्हा दाखल केला आहे.

गुन्हा दाखल केल्यानंतर सुषमा अंधारे प्रतिक्रिया देत म्हणाले, “कोणी सत्य बोलाल त्यांना भीती दाखवली जाते. जर मोजींची नक्कल केल्याप्रकरणी माझ्यावर गुन्हा दाखल झाला असेल. तर मी नक्कल केली नाही. माझ्यापेक्षा जास्त मोदींची नक्कल तर राज ठाकरेंनी केली. तुम्ही जर प्रश्न विचारले आणि सत्य मांडणे गुन्हा असेल. तर मग आम्ही गुन्हेगार आहोत.”

 

 

 

 

Exit mobile version