HW News Marathi
क्राइम

कुर्ल्यात गोळीबार, एक जण गंभीर जखमी

मुंबई | कुर्ला पश्चिम येथील विनोबा भावे नगरात आज (५ मार्च) सकाळी गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. यात बिल्ला नावाच्या इसम गंभीररित्या जखमी झाला असून उपचारासाठी त्याला सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बिल्ला हा कुर्ला परिसरातील गुंड असून त्याचे खरे नाव जानू पवार असे आहे.

बिल्लावर दोन गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. हा हल्ला पूर्व वैमनस्यतून झाला असावा अशी माहिती कुर्ला पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एकाला संशयिताला ताब्यात घेतले आहे. कुर्ला पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपचा शोध सुरू आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मातंग समाजाच्या मयत दफनविधीला गावक-यांचा विरोध, पोलीस बंदोबस्तात झाला दफनविधी

News Desk

सहा वर्षाच्या मुलीसोबत छेडछाड

News Desk

रणवीर सिंह यांच्या न्यूड फोटोशूटमुळे पोलिसांत गुन्हा दाखल

Aprna