Site icon HW News Marathi

औरंगाबादमधील जैन मंदिरातून दोन किलो सोन्याची मूर्ती लंपास; पोलिसांकडून शोध सुरू

मुंबई | औरंगाबादमधील कचनेरच्या श्री 1008 चिंतामणी पार्श्वनाथ दिंगबर जैन (Shri 1008 Chintamani Parshwanath Digambar Jain Mandir) मंदिरातील 2 किलो वजनाची सोन्याची मूर्ती चोरीला गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे औरंगबाद हदरुन गेले आहे. चिंतामणी पार्श्वनाथ भगवान यांची मूर्ती अज्ञात चोरठ्यांनी बदलल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकाराची माहिती मिळताच स्थानिक स्वतः पोलीस अधीक्षक मनीष कालवानिया घटनास्थळी भेट देऊन तपासाचे आदेश दिले आहेत.

 

चिंतामणी पार्श्वनाथ भगवान यांची मूर्ती ही अज्ञात व्यक्तींनी मंदिराच्या गाभाऱ्यातून लंपास केली आहे. आणि त्या जागी पंचधातूची हुबेहूब दिसणारी मूर्ती मंदिरातच्या गाभाऱ्यात बसविली. काही दिवसांपूर्वी दर्शनासाठी आलेले भाविकांना चिंतामणी पार्श्वनाथ भगवान यांची मूर्तीच्या पाया जवळचा भाग पांढरा पडल्याचे लक्ष्यात आले. यानंतर चिंतामणी पार्श्वनाथ भगवान यांची मूर्तीचे वजन आणि परिक्षण करण्यात आले. तेव्ह चिंतामणी पार्श्वनाथ भगवान यांची मूर्ती 1 किलो 66 ग्राम भरली. चिंतामणी पार्श्वनाथ भगवान यांची सोन्याची मूर्ती ही दोन किलो 300 ग्राम वजनाची आहे. यामुळे चिंतामणी पार्श्वनाथ भगवान यांची मूर्तीची अदलाबदली नेमकी केव्हा, कोणी बद्दली आणि मंदिरात कोणाच्या लक्षात न आल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहे.

 

Exit mobile version