Site icon HW News Marathi

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर विशेष सीबीआय न्यायालय आज देणार निकाल

मुंबई | राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या जामीन अर्जावर विशेष सीबीआय (CBI) न्यायालयात आज निर्णय घेणरा आहे. देशमुख यांच्या जामीन अर्जावर दोन्ही बाजूने युक्तीवाद गुरुवारी (20 ऑक्टोबर) पूर्ण झाला होता. देशमुखांच्या जामीन अर्जावर मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय न्यायालयात आज (21 ऑक्टोबर) देशमुखांवर कथित 100 कोटी वसुली प्रकरणात 11 महिन्यापासून ते तुरुंगात आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी यामुळे आज न्यायालय काय निर्णय देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, देशमुखांवर 100 कोटी वसुलीप्रकरण आणि मनी लाँड्रिग प्रकरण या दोन्ही प्रकरणात ईडी आणि सीबीआने गुन्हा दाखल करत अटक केले होते. मुंबई उच्च न्यायालयाकडून ईडीने दाखल केल्या गुन्ह्यात देशमुखांना जामीन मिळाला आहे. मात्र, सीबीआयकडून दाखल केलेल्या गुन्ह्यात देशमुखांना जामीन मिळालेला नव्हता. यानंतर देशमुखांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. यानंतर देशमुखांच्या सर्वोच्च न्यायालयाने ही उच्च न्यायालयाच्या निर्णयात हस्तक्षेप करणार नाही, असे स्पष्ट केले.

सीबीआयतर्फे गुरुवारी अतिरिक्त महान्यायअभिकर्त अनिल सिंह यांनी न्यायालयात पूर्ण केला. या प्रकरणात देशमुख आणि सीबीआय दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाल्यावर विशेष न्यायालयाने न्या. एस. एच. ग्वालानी यांनी आज निकाल देणार आहे. देशमुखांना 2 नोव्हेंबर 2021 रोजी अटक करण्यात आली होती आणि सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत.

संबंधित बातम्या

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना जामीन मिळूनही तुरुंगातच रहावे लागणार; कारण…

Exit mobile version