Site icon HW News Marathi

कोरियन महिलेसोबत विनयभंग होणारा व्हिडिओ व्हायरल; आरोपींना मुंबई पोलिसांनी घेतले ताब्यात

मुंबई | कोरियन महिला (South Korea) युट्यूबरसोबत मुंबईत विनयभंग करण्याचा धक्कायदायक प्रकार घडला आहे. या कोरियन युट्यूबरसोबत झालेल्या विनयभंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने एकच खळबळ माजली आहे. ही घटना मुंबईतील खारमध्ये घडल्याची माहिती मिळाली आहे. या महिलेसोबत झालेला विनयभंगाचा प्रकाराची माहिती तिच्या युट्यूबरच्या फॉलोअरने मुंबई पोलिसांना (Mumbai Police) टॅग करत व्हिडिओ ट्विट केला आहे. या प्रकाराची माहिती मिळताच खार मुंबई (Khar Police) पोलिसांनी सुमोटो अंतर्गत तक्रार दाखल करत  दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे.

 

ही कोरियन महिला युट्यूबर मुंबईत रात्रीच्या वेळी फिरत होती. ही महिला खार भागात रात्री 8 वाजताच्या सुमारात विनयभंगची घटना घडली होती. या महिला युट्यूबरने लाईव्ह स्ट्रिमिंग करत असताना तिच्यासोबत झालेल्या विनयभंगाचा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून हा व्हिडिओने महिलेच्या युट्यूबरच्या फॉलोअरने पोलिसांना टॅग करत ट्वीट केले. या व्हिडिओच्या आधारे मुंबई पोलिसांनी कारवाई केली. खार पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले असून या दोघांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील पोलिसांनी मोबीन शेख(19) आणि मोहम्मद अन्सारी (20) आरोपींना अटक केले आहे.

 

नेमका काय आहे प्रकार

कोरियन महिला युट्यूबर भारतात फिरण्यासाठी आलेली आहे. ही महिला युट्यूबर भारतातील विविध ठिकाणी फिरताना लाईव्ह स्ट्रिमिंग करत असते. ही महिला खारच्या रोड क्रमांक 5 वर फिरत असताना लाईव्ह स्ट्रिमिंग करत असताना  एक तरुण त्या ठिकाणी आली. यानंतर त्या तरुणाने महिला युट्यूबरशी संवाद साधला. त्या तरुणाने महिला युट्यूबरचा हात पकडून तिला जबरदस्ती त्याच्या बाईकवर बसण्यास सांगत होता. तरुणाने त्या महिला युट्यूबरचा चुंबन घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, महिला युट्यूबरला त्यांचे मनसुबे ठिक दिसत नसल्याचे जाणीव होताच तिने नाही म्हणून सांगितले. यानंतर महिला युट्यूबर त्या तरुणापासून लांब चालत गेली. यानंतर तरुणाने त्यांच्या मित्रासोबत बाईनवर त्या महिला युट्यूबरचा पाठला केला. त्या महिला युट्यूबरला तिला जिथे जायचे आहे तिथे सोडण्याची ऑपर दिली. पण, या दोन तरुणांकडे महिला युट्यूबरने दुर्लक्ष केले

 

 

Exit mobile version