Site icon HW News Marathi

उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला केल्याप्रकरणी पोलिसांनी 5 जणांना केली अटक

मुंबई | शिंदे गटाचे आमदार उदय सामंत (Uday Samant) यांच्या गाडीवर काल रात्री शिवसैनिकांनी (Shiv Sena)Shiv Sena हल्ला केल्याची घटना घडली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुण्यातील दगडुशेठ गणपतीच्या दर्शन घेण्यासाठी जात होते. त्यावेळी उदय सामंत हे सुद्धा दगडुशेठ मंदिराच्या दिशेने जात असताना सामंतांच्या गाडीवर हल्ला झाला. या प्रकरणी पुण्यातील भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या हल्ल्यात एक व्यक्ती जखमी झाला असून जखमी व्यक्तीला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.  या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक करण्यात आले आहे.

पोलिसांनी शिवसेनेचे पुणे शहर अध्यक्ष संजय मोरे, सुरज लोखंडे, संभाजीराव थोरवे यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. यानंतर पोलिसांनी पाच जणांना अटक केले आहे. या हल्ल्या प्रकरणात पोलिसांनी हिंगोलीतील शिवसेना पदाधिकारी बबन थोरात यांनी चीथावणीखोर वक्तव्य केल्यामुळे त्यांना मुंबईतून ताब्यात घेतले असून थोरातला पुण्याच्या दिशने पोलीस घेऊन येत आहेत.

असा आहे घटनाक्रम

शिवसेनेचे नेते आणि माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोघेही कात्रज परिसरात आले होते. या पार्श्वभूमीवर कात्रज परिसरात तणाव जन्य परिस्थिती निर्माण झाली होती. यामुळे पोलिसांचा मोठा फौज फाटा तैनात करण्यात आला होता. कात्रज येथे सभा झाल्यानंतर आदित्य ठाकरे मुंबईला येणार होते. परंतु, आदित्य ठाकरेंनी अचानक शंकर महाराज मठाचे दर्शन घेण्यासाठी जाणार असल्याचे सांगितले. यानंतर स्वारगेटकडी रस्ता पोलिसांनी रस्ता रिकामा केला होता. यानंतर ठाकरेंचा कॉन्व्हाय कात्रज चौकात थांबला होता. आणि मुख्यमंत्र्यांचा कॉन्व्हाय गंगाधाम मार्गे शंकर महाराज मठाकडे आधीच गेला होता. यानंतर सामंत यांची गाडी कात्रज चौकात आली. आदित्य ठाकरेंची सभा संपल्यानंतर संपूर्ण चौकात शिवसैनिकांनी भरला होता. सामंत यांची सिग्नलला थांबली होती. त्यावेळी सामंत यांची गाडी शिवसैनिकांनी पाहिले, यानंतर गद्दार गद्दार म्हणत गाडीवर चप्पल, दगड आणि बाटल फेकल्या. हा हल्ला सुरू असताना सामंत यांची गाडीची काच फुटली. आजूबाजूची परिस्थिती पाहात सामांत गाडीला वाट करून निघाले.

 

 

 

 

 

Exit mobile version