HW News Marathi
क्राइम

बीड हादरले! भाजप शहराध्यक्ष भगीरथ बियाणींची स्वत:वर गोळी झाडून केली आत्महत्या

बीड | बीड (Beed) येथील भाजपचे शहराध्यक्ष भगिरथ बियाणी (Bhagirath Biyani) यांनी स्वता:जवळील बंदुकीने डोक्यात गोळी झाडून घेत आत्महत्या केली. ही घटना आज (11 ऑक्टोबर) सकाळी बीड शहरातील एमआयडीसी भागातील बियाणी यांच्या राहत्या घरी घडली. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट नाही. बियाणी हे भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते होते.

भगिरथ बियाणी यांनी सोमवारी रात्री आपल्या कुटूंबासमवेत रात्री उशिरापर्यंत त्यांनी गप्पा मारल्या. यानंतर भगिरथ बियाणी आपल्या खोलीत जावून झाेपले. पहाटेच्या सुमारास उशिरापर्यंत दरवाजा उघउला नसल्याने कुटूंबियाने पाहिले तर बियाणी हे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. भगिरथ बियाणी यांना त्यांच्या कुटूंबियाने तात्काळ बीड शहरातील एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले.

दरम्यान, डॉक्टरांनी भगिरथ बियाणी यांना मृत घोषित केले. यानंतर भगिरथ बियाणी यांचे मतदेह शवविच्छेदन करण्यासाठी जिल्हा रूग्णालयात नेण्यात आला. या घटनेची माहिती समजताच खासदार प्रीतम मुंडे, पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकुर यांच्यासह भाजपच्या शेकडो पदाधिकारी कार्यकर्त्यांनी रुग्णालयाकडे धाव घेतली. रुग्णालयाबाहेर मोठा जमाव जमला होता. भगिरथ बियाणी यांच्या आत्महत्ये मागचे कारण अद्याप कळू शकले नाही. या प्रकरणाचा तपास पोलीस घेत असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बायकोच्या लफडेबाजाली कंटाळून नवऱ्याची आत्महत्या

News Desk

मोबाईल चोरामुळे तरुणीला एक पाय आणि हाताची बोटे गमवावी लागली

News Desk

व्हीआयपी नवी आय पी मोबाईल नंबर च्या नावाखाली लोकांची फसवणूक करणा-या रँकेटचा पर्दाफाश

News Desk