HW News Marathi
क्राइम

भाजपा नगरसेवकाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल

ठाणे कल्याण डोंबिवली महापालिकेतील भाजपाचे नगरसेवक दया गायकवाडसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष अश्विनी धुमाळ व त्यांच्या पतीच्या विरोधात ठाणे वर्तकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पीडित तरुणीला ब्लॅकमेल करून बलात्कार करण्यास मदत केल्याबद्दल दोघांवर देखील गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पीडित तरुणीने ठाणे पोलीस आयुक्तांकडे लेखी तक्रार केली होती.

तरुणीने केलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे की, तरुणीशी दया गायकवाड सोबत फेसबूकवर ओळख झाली. त्यानंतर ते एका ठिकाणी भेटले. त्यानंतर दया गायकवाडने तिला टिटवाळा व बदलापूर येथे लॉजवर नेऊन तिच्याशी शरीरसंबंध ठेवले. लग्नाचे आमिष दाखवून दयाने तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप तरुणीने केला आहे. दया व त्याचे अन्य दोन साथीदार तरुणीचा छळ करीत आहे. या प्रकरणाचा तपास करण्याचा तक्रार अर्ज तरुणीने आयुक्तांकडे केला होता.

बलात्काराच्या गंभीर आरोपामुळे भाजप नगरसेवक वादाच्या भोव:यात सापडले आहे. दरम्यान नगरसेवकाच्या पत्नीने तरुणीच्या विरोधात खडकपाडा पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जुन्या नोटा बदलण्याचा धंदा जुलैमध्येही तेजीत

News Desk

भरदिवसा सशस्त्र दरोडा; 15 मिनिटांत लुटला कोट्यावधीचा ऐवज

News Desk

किन्हीराजा मध्ये जऊळका रेल्वे पोलिसांचे “पथसंचलन”

News Desk