HW News Marathi
क्राइम

शहांवर टीका केल्यासंदर्भात चव्हाणांवर कंबोजांनी पोलिसात केला गुन्हा दाखल

मुंबई | राष्ट्रावादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण (Vidya Chavan) यांच्यावर भाजप नेता मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी सांताक्रूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. कंबोज यांनी विद्या चव्हाणांवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून पोलिसात तक्रार केली आहे. या पार्श्वभूमीवर कंबोज यांनी आज (29 ऑगस्ट) पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केलेल्या गुन्ह्याची कॉपी ट्वीट करत दिली आहे.

 

कंबोज ट्वीटमध्ये म्हटले, “जय बजरंग बली, तोड दुश्मन की नली… जय सियाराम ! विद्या ताई चव्हाण यांच्याविरुद्ध आयपीसी ५०५ (२), ३७ (१), १३५, ५०० अंतर्गत आयआर नोंदवला! हर हर महादेव !,” असे लिहिले असून यात गुन्हा नोंद केल्याचे माहिती दिली असून गुन्ह्याची कॉपी ट्वीट केली आहे. यात ट्वीटमध्ये विद्या चव्हाण यांना टॉग केले आहे.

विद्या चव्हाणांनी अमित शहाच्या जन्मस्थान आणि भाषेवरून टीका केली होती. यानंतर गेल्या दोन दिवसापूर्वी कंबोजने चव्हाण यांना ट्वीट करत जय श्रीराम असे ट्विट केले होते. यातून काही स्पष्ट होत नाही. तेवढ्यात कंबोजने आज चव्हाणविरोधा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केल्याची कॉपी ट्वीट केली होती.

 

 

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महिला पोलिसांची आत्महत्या

News Desk

पैसे देण्यास नकार दिल्याने तिचे स्तनच कापले

News Desk

समाजासाठी पुरुषांवरील बलात्कार हा ‘बलात्कार’ नाही का ?

News Desk