Site icon HW News Marathi

झोमॅटोवर मिठाई खरेदी करणं पडल महागात; २ लाख ४० हजार ३१० रुपयांची ऑनलाईन फसवणूकीचा प्रकार समोर

zomato scam

मुंबई – दिवाळीपूर्वी बाजारात सर्वत्र खरेदीची धूम पाहायला मिळाली. बाजारपेठा गर्दीने फुलल्या होत्या. सर्वत्र विविध ऑफर्सचा पाऊस पडताना दिसून आला. मात्र, सूट व सवलतींच्या नादात वारंवार लोकांच्या फसवणुकीचे प्रकार होत असल्याचे समोर येत आहे. अंधेरी पश्चिमच्या वीरा देसाईमध्ये राहत असलेल्या ४९ वर्षीय महिलेला तब्बल २,४०,३१० रुपयांना गंडा घालण्यात आला आहे. झोमॅटो ॲपवर तिवारी स्वीट्समधून 1 हजार रुपयाचे स्वीट विकत घेऊन त्याचे पेमेंट ऑनलाईन करण्याचा प्रयत्न केला मात्र ते झाले नाही म्हणून ॲपवरून मिळालेल्या तिवारी स्वीटच्या मोबाईल नंबरवर संपर्क केला. आरोपीने तो तिवारी स्वीट मधून बोलत असल्याचे सांगितले. तेव्हा, महिलेने एक हजार रुपयांचे स्वीट खरेदी केले असून हि रक्कम ऑनलाईन ट्रान्सफर होत नसल्याचे सांगितले.

आरोपीने बिलाची रक्कम स्वीकारण्या करिता महिलेला तिच्या क्रेडिट कार्डचा क्रमांक व तिच्या मोबाईलवर प्राप्त झालेला OTP द्यावे लागेल असे सांगितले. आरोपीने सांगितल्याप्रमाणे महिलेने तिच्या मोबाईलवर प्राप्त झालेला OTP आरोपीला सांगितला. OTP देताच महिलेच्या क्रेडिट कार्ड मधून एकूण २,४०,३१० रुपये वजा झाल्याचा बँकेचा मेसेज आला. महिलेला तीची ऑनलाईन फसवणूक झाल्याचे समझताच ओशिवरा पोलीस ठाण्यात धाव घेतली. महिलेच्या या तक्रारीवरून पोलिसांनी तात्काळ दखल घेऊन भादवी कलम 419, 420, सह माहिती तंत्रज्ञान कायद्याचे कलम 66(क)(ड) अन्वये गुन्हा नोंद केला.

ओशिवरा पोलीस ठाण्याचे सायबर अधिकारी पोवीस उप निरक्षक दिगंबर कुरकुटे, हेड कॉन्स्टेबल कोंडे, पोलीस कॉन्स्टेबल विक्रम सरनोबत यांनी महिलेकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पेटीएम (PAYTM), फोनपे (PhonePay), फ्लिपकार्ट (Flipkart) पेमेंट ॲपच्या नोडल अधिकाऱ्यांशी संपर्क केला तसेच ईमेलद्वारे पत्र व्यवहार करून तात्काळ फसवणूक झालेल्या रकमेपैकी २ लाख २७ हजार २०५ रुपये इतकी रक्कम फ्रीझ केली. दरम्यान, मिळालेल्या माहिती नुसार ओशिवरा पोलीस ठाण्याच्या सायबर विभागाकडून पीडित महिलेला २,४०,३१० रुपयांपैकी २,२७,२०५ रुपये रिफंड करण्यात आली आहे.

Exit mobile version