HW Marathi
क्राइम मनोरंजन

हार्दिक पांड्या, केएल राहुलसह करण जोहरवर जोधपूरमध्ये गुन्हा दाखल

जोधपूर | कॉफी विथ करणच्या ६ व्या सिजनमध्ये भारतीय क्रिकेटर हार्दिक पांड्या आणि केएल राहुल यांनी महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे राजस्थानच्या जोधपूरमध्ये गुन्ह्यांची नोंद झाली आहे. हे प्रकरण थंड होतानाचे चित्र दिसत नाही. कारण या दोन्ही क्रिकेटरांबरोरच शोचा निर्माता करण जोहर यांच्यावर देखील गुन्हा दाखल झाला आहे.

पांड्या आणि राहुल यांनी महिलांचा अपमान केल्यामुळे या दोघांना ऑस्ट्रेलिया दौरा अर्धवट सोडून मायदेशात परतावे लागले होते. त्यांच्यावर वर्षाची बंदी घालावी, असे बीसीसीआय मधील काही अधिकाऱ्यांचे मत होते. परंतु दोघांनी त्वरीत माफी मागितल्याने आणि या प्रकरणाची चौकशी पूर्ण झाली नसल्याने या दोघांनाही संघात परत स्थान दिले होते. पांड्या सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे.  तर राहुल भारतीय ‘अ’ संघाकडून खेळत आहे.

 

Related posts

छोटा राजनचा शार्प शुटर अटकेत

News Desk

बदलापुरात लहानग्याच्या अपहरणाचा प्रयत्न फसला

News Desk

‘पियानो फॉर सेल’चा ग्रँड प्रीमियर सोहळा संपन्न

News Desk