HW News Marathi
क्राइम

शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्याविरोधात दहिसर पोलिसात लेखी तक्रार दाखल

मुंबई | शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे (Prakash Surve) यांच्याविरोधात दहिसर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे. सर्वेंच्या नेतृत्वाखाली दहिसर पूर्व कोकणीपाडा परिसरात पक्ष प्रवेश कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होता. या कार्यक्रमात चितावणीखोर वक्तव्य केल्यामुळे प्रकाश सुर्वेविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती.

प्रकाश सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली 14 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजता दहिसर पूर्व कोकणीपाडा परिसरात पक्ष प्रवेश कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रकाश सुर्वे म्हणाले, “जागा दाखवल्याशिवाय स्वस्थ बसू नका, कोणाचीही दादागिरी चालू देणार नाही, कोणी आरे केले तर त्याचे कारे करा आणि त्याला मारा, प्रकाश सुर्वे इथे बसला आहे. हात नसेल तर पाय तोडा, मी पोलीस ठाण्यातून टेबल जामीन करीन.”

प्रकाश सुर्वे यांच्या या वक्तव्यामुळे संतप्त झालेल्या शिवसेनेचे माजी नगरसेवक उदेश पाटेकर यांनी शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्याविरोधात दहिसर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सांगली साधू मारहाण प्रकरणी पोलिसांनी सहा आरोपींना घेतले ताब्यात

Aprna

भोकर तालुक्यातील एका आदिवासी मुलीची मध्यप्रदेशात विक्री

News Desk

औषध देण्याच्या बहाण्याने विवाहितेवर भोंदू बाबाचा बलात्कार

News Desk