Site icon HW News Marathi

बच्चू कडूंना न्यायालयने जामीन मंजूर केल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात बोलताना म्हणाले…

मुंबई | राजकीय आंदोलन केल्याप्रकरणी प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्वेसर्वा आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांना न्यायालयीने जामीन मंजूर केला आहे. मुंबईतील गिरगाव महानगर दंडाधिकारी  न्यायालयाने (Girgaon Metropolitan Magistrate Court) बच्चू कडू यांना न्यायालयीन कोठडीचा निर्णय दिला होता. परंतु, न्यायालयाने आज (14 सप्टेंबर) सायंकाळी जामीन मंजूर झाल्याने बच्चू कडूंनी समधान व्यक्त केले आहे.

दरम्यान, या प्रकरणी न्यायालयाने सुरुवातील बच्चू कडूंचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता. यानंतर सायंकाळी बच्चू कडू यांना न्यायालयाने जामीन अर्ज मंजूर केला. या प्रकरणावर सुनावणीदरम्यान न्यायालयाने बच्चू कडूंना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती.

न्यायालयाकडून जामीन अर्ज मिळाल्यानंतर बच्चू कडू यांनी माध्यमांशी बोलताना म्हणाले, “मी पेपरफुटीचे प्रकरण झाले होते. याविरोधात मी आंदोलनात संघर्ष झाला होता. यात माझ्यावर कलम ३५३ दाखल झाले होते. या प्रकरणी माझ्यावर कधी गुन्हा दाखल झाला आणि कधी समन्स बजावले हे सुद्धा मला माहिती नव्हते. आणि आता थेट न्यायालयीन कोठडी सुनावली. मात्र न्यायालयाने माझा जामीन मंजूर केल्याबद्दल मी धन्यवाद मानतो.

यानंतर पत्रकारांनी बच्चू कडू यांना मंत्रिमंडळ विस्तारव प्रश्नविचारल्यावर ते म्हणाले, “मंत्रिपद मिळणे हा आमचा अधिकार आहे आणि ते भेटल्याशिवाय राहणार नाही. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मला वैयक्तिक आणि मीडियासमोर मंत्रिपद देण्याचा शब्द दिला आहे.

संबंधित बातम्या

आमदार बच्चू कडू यांना न्यायालयीन कोठडी; मुंबईच्या गिरगाव न्यायालयाचा निर्णय

 

Exit mobile version