Site icon HW News Marathi

नोकराने मालकाच्याचं घरी केली चोरी. दिंडोशी पोलिसांनी 24 तासात इंदोरहुन केले अटक

मुंबई | घरफोडी करून परराज्यात पळून गेलेल्या आरोपीला दिंडोशी पोलिसांनी २४ तासांच्या आत 100 टक्के मुद्देमलासह इंदोर, मध्य प्रदेशातून अटक केली आहे. तब्बल ३४,४१,००० रुपयांचा मुद्देमाल यावेळीस पोलिसांनी हस्तगत केला आहे. ऍड. वेदिका चौबे या त्यांच्या कुटुंबासह ९ जूनला वाराणसीला गेल्या होत्या. वाराणसीहून १६ जूनला घरी परत आल्यावर बेडरूमचा वॉकिंग वाडरोब दरवाजा तुटलेला दिसला आणि सर्व साहित्य अस्थाव्यस्थ पडलेले दिसले. लोकेरमध्ये एकूण ३४,४१,०० रुपयांचे सोन्याचे व डायमंडचे दागिने नसल्याचे दिसून आले म्हणून ऍड वेदिका चौबेंनी दिंडोशी पोलीस ठाण्यात तक्रार केली.

दिंडोशी पोलीस ठाण्यामध्ये एका अज्ञात इसमाविरुद्ध बेडरूमच्या स्लाइडिंगच्या दरवाजातून आतमध्ये प्रवेश करून दरवाजाचे लॉक तोडून घरघोडी केली म्हणून भा. द. वि चे कलाम ४५४, ४५७, ३८० अंतर्गत गुन्हा करण्यात आला होता. हा गुन्हा गंभीर असल्याने वरिष्ठांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन २ पोलीस पथके बनवून तपासाच्या सूचना दिल्या. गुन्हे प्रकटीकरणाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. चंद्रकांत घार्गे आणि पोलीस उपनिरीक्षक अजित देसाई यांनी ऍड वेदिका यांच्याकडून माहिती घेतली असताना हा गुन्हा त्यांच्याकडे पूर्वी काम करत असलेला अक्षय जाठव याने केला असल्याचा संशय व्यक्त केला.

पोलिसांनी या मध्ये पुढे तपस केला आणि अक्षय जाठव हा इंदोर, मध्य प्रदेशमध्ये असल्याची माहिती मिळाली. वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण पथक तात्काळ वाहनाने इंदोरला गेले आणि आरोपीला ताब्यात घेतले आणि त्याची चौकशी केली. अक्षयने हा गुन्हा केला असल्याची कबुली दिल्याने त्याला अटक करण्यात आली. त्याच्या कडून चोरी केलेले तब्बल ३४,४१,०० रुपयांचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.

Exit mobile version