HW News Marathi
क्राइम

औषध देण्याच्या बहाण्याने विवाहितेवर भोंदू बाबाचा बलात्कार

औषध देण्याच्या बहाण्याने एका भोंदू बाबाने १९ वर्षीय विवाहीतेवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. अकोला जिल्ह्यातील तेल्हार गावात ही घटना घडली. पंचगव्हाण येथील नईम बाबा हा विवीध आजारावर जादू टोणा करून उपचार करत होता. याच बाबाकडे पतीसाठी औषध आणण्यासाठी ही महिला १२ ऑक्टोबरला गेली होती. त्यावेळी तीच्या बरोबर तीचा पतीही होता. मात्र बाबाने तीच्या पतीला बाहेर पाठवले.

तूझा पतीच्या अंगात भूत असल्याची बतावणी त्यांनी केली. शिवाय ते बाहेर काढण्यासाठी तूला त्याग करावा लागेल असेही त्यांनी सांगितले. त्यानंतर त्याने आत मधील रूम मध्ये नेवून तीच्यावर बलात्कार केला. या बाबत कोणाला सांगितले तर तूला मारून टाकेन अशी धमकीही त्याने यावेळी दिली. घरी गेल्यानंतर पिडीत महिला रडत बसली होती. शेवटी तीने झालेली घटना सांगतली. या बाबत तेल्हार पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर भोंदू बाबाला अटक करण्यात आली असून त्या विरोधात बलात्काराचा गुन्हा ही दाखल करण्यात आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राशी कापूस बियाणेवर बंदी  

News Desk

बसवर फेकला पेटता गोळा

News Desk

पुण्यात भरदिवसा गोळीबार, विद्यापीठ चौक परिसरातील घटना

News Desk