Site icon HW News Marathi

अखेर अमरावतीतील ‘ती’ तरुणी साताऱ्यात सापडली; पोलीस आज घरी आणणार

मुंबई | अमरावतीत (Amravati) एका 19 वर्षीय हिंदू तरुणीचे अपहरण करून बळजबरीने आंतरधर्मीय विवाह केला आहे, असा आरोप  खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी केला आहे. यावेळी राणांनी पोलीस उपायुक्त विक्रम साळींना दोन तासांत मुलीला शोधण्याचे अल्टीमेटम दिले आहे. यानंतर अपहरण केलेली 19 वर्षीय तरुणी सापडली असून ही तरुणी पोलिसांना सहा तासांच्या प्रयत्नानंतर सापडली. या तरुणीला पोलीसआज (8 सप्टेंबर) अमरावतीत तिच्या घरी आणणार आहे.

या तरुणीला पोलिसांनी साताऱ्यातून ताब्यात घेतली असून तरुणीला पोलीस आज अमरावतीला आणणार आहेत. राणांनी काल (7 सप्टेंबर)  या पार्श्वभूमीवर अमरावतीच्या राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये राणांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. यानंतर पोलिसांनी मुलीने केल्या चॅटिंगवरून पोलिसांनी सोहेल शहा नवाच्या संशयित आरोपीला पकडले होते. यावेळी राणांनी अपहर झालेल्या तरुणींच्या आईला घेऊन पोलिसांत गेली होती. त्यावेळी राणांनी पोलिसांसोबत खडाजंगी झाली होती.

दरम्यान, अमरावतीतील राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये भाजपने जाऊन  पोलीस अधिकाऱ्यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. या तरुणीला अमरावतीने एकटी रेल्वेने प्रवास करत होती. या तरुणींची माहिती पुणे रेल्वे पोलीस आणि सातारा पोलिसांशी तिचे लोकेशन शेअर केले. यानंतर तरणीला पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी माध्यमांना माहिती दिली आहे.

संबंधित बातम्या

तरुणीच्या अपहरणावरून नवनीत राणांचे पोलिसांसोबत खडाजंगी

 

Exit mobile version