HW News Marathi
क्राइम

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना जामीन मंजूर

मुंबई | कथित 100 कोटी वसुली घोटाळ्याप्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना जामीन मंजूर झाला आहे. देशमुखांना 1 लाखांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आलेला आहे. तब्बल 13 महिन्यानंतर देशमुख हे तुरुंगातून बाहेर येणार आहे. मुंबई उच्च न्यायालयात आज (12 डिसेंबर) झालेल्या सुनावणीत देशमुखांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. देशमुखांना जामीन मंजूर झाल्यानंतर त्यांच्या घराबाहेर कार्यकर्त्यांकडून जल्लोष सुरू आहे. सध्या देशमुखांवर जसलोक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

यापूर्वी सीबीआयच्या विशेष न्यायालयात देशमुखांनी जामीनासाठी अर्ज केलेला होता. देशमुखांकडून आरोग्याच्या कारणास्तव जामीन मागण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, न्यायालयाने देशमुखांचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता. यानंतर देशमुखांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

दरम्यान, देशमुखांवर कथित 100 कोटी वसुलीप्रकरण आणि मनी लाँड्रिग प्रकरण या दोन्ही प्रकरणात ईडी आणि सीबीआने गुन्हा दाखल करत अटक केले होते. यानंतर परंतु, मुंबई उच्च न्यायालयाकडून ईडीने दाखल केल्या गुन्ह्यात देशमुखांना जामीन मिळाला आहे. मात्र, सीबीआयकडून दाखल केलेल्या गुन्ह्यात देशमुखांना जामीन मिळालेला नव्हता. न्यायालयात आज झालेल्या सुनावणीत देशमुखांना अखेर जामीन मंजूर झालेला आहे.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘ती’ सर्व शस्त्रे क्रॉफर्ड मार्केटमधून आणल्याची भाजप पदाधिकाऱ्याची कबुली

News Desk

पोलिसांमुळे महिला वकिलाचा आत्महत्येचा प्रयत्न फसला

News Desk

प्रियकरानं केली प्रेयसीची हत्या

News Desk