Site icon HW News Marathi

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या जामिनाला 10 दिवसांची स्थगिती

मुंबई | कथित 100 कोटी वसुली घोटाळ्याप्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना जामीन मंजूर झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयात आज (12 डिसेंबर) झालेल्या सुनावणीत देशमुखांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. देशमुखांना 1 लाखांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आलेला आहे. परंतु, देशमुखांना 10 दिवसांची स्थगिती दिली आहे. सीबीआयने दाखल केलेल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

देशमुखांवर कथित 100 कोटी वसुलीप्रकरण आणि मनी लाँड्रिग प्रकरण या दोन्ही प्रकरणात ईडी आणि सीबीआने गुन्हा दाखल करत अटक केले होते. यानंतर परंतु, मुंबई उच्च न्यायालयाकडून ईडीने दाखल केल्या गुन्ह्यात देशमुखांना जामीन मिळाला आहे. मात्र, सीबीआयकडून दाखल केलेल्या गुन्ह्यात देशमुखांना जामीन मिळालेला नव्हता. न्यायालयात आज झालेल्या सुनावणीत देशमुखांना अखेर जामीन मंजूर झालेला आहे.

देशमुखांना कथित वसुली प्रकरणी ईडीने डिसेंबर 2021 रोजी अटक केली होती. तेव्हापासून देशमुख हे तुरुंगात आहे. सध्या देशमुखांवर जसलोक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. देशमुखांना जामीन मंजूर झाल्यानंतर त्यांच्या घराबाहेर कार्यकर्त्यांकडून जल्लोष सुरू आहे. न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सीबीआय सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. यामुळे देशमुखांच्या जामिनाला स्थगिती देण्यात आली आहे.

देशमुखांच्या वकिलांनी माध्यमांशी बोलताना म्हणाले…

“देशमुखांचा पासपोर्ट प्रशासनाकडे जमा केला आहे. आणि देशमुखांनी पुढील तपासात सहकार्य करणे अशा अटी ठेवल्या आहेत”, अशी माहिती देशमुखांचे वकील अनिकेत निकम यांनी माध्यमांशी बोलताना दिली. यापूर्वी सीबीआयच्या विशेष न्यायालयात देशमुखांनी जामीनासाठी अर्ज केलेला होता. देशमुखांकडून आरोग्याच्या कारणास्तव जामीन मागण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, न्यायालयाने देशमुखांचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता. यानंतर देशमुखांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

 

संबंधित बातम्या

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना जामीन मंजूर

 

Exit mobile version